अंबाजोगाई प्रतिनिधी :– अंबाजोगाई तालुक्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अनपेक्षित व विक्राळ अतिवृष्टीमुळे शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांवर अभूतपूर्व संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर आज अंबाजोगाई येथे शेतकऱ्यांनी भव्य रुमने मोर्चा काढत उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. या वेळी पूरपरिस्थितीने बाधित झालेल्या शेतकरी वर्गाच्या वतीने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष) तर्फे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेती, पशुधन आणि दैनंदिन जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, सोयाबीन, कापूस, ज्वारी, बाजरी, मका, तूर आणि ऊस यासारखी प्रमुख पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक ठिकाणी शेतजमिनी खरडून वाहून गेल्या असून तळ्यांचे बांध फुटल्यामुळे पाणी शेतात शिरले आहे. ऊस पिकामध्ये पाणी शिरल्याने ते जमीनदोस्त झाले असून उत्पादन क्षमता संपूर्णपणे नष्ट झाली आहे.
तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेले पशुधन मोठ्या प्रमाणावर वाहून गेले किंवा मृत्यूमुखी पडले आहे. शेतीचे १०० टक्के नुकसान झाल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून त्यांच्या पुनर्वसनासाठी तातडीची उपाययोजना आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मोर्चात सहभागी शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी खालील मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी केली:
1️⃣ शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी.
2️⃣ ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करण्यात यावा.
3️⃣ शेतकऱ्यांना हेक्टरी रु. ५०,०००/- तात्काळ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे.
4️⃣ खरडून गेलेल्या जमिनींसाठी एकरी रु. २,५०,०००/- मदत म्हणून देण्यात यावी.
5️⃣ संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, अपंग व विधवा महिला यांचे थकीत मानधन तात्काळ देण्यात यावे.
6️⃣ शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी व परीक्षा फी सरसकट माफ करण्यात यावी.
7️⃣ अतिवृष्टीमुळे कामाविना झालेल्या शेतमजुरांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी.
8️⃣ शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळण्यासाठी ई-पिक पाहणी व फार्मर आयडीची अट शिथिल करण्यात यावी.
9️⃣ मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना वारसा हक्कानुसार अनुदान देण्यात यावे.
जनावरांसाठी चाऱ्याची तातडीने व्यवस्था करण्यात यावी.
मोर्चादरम्यान शेतकऱ्यांनी सरकारकडे तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
मा. राजेसाहेब देशमुख (मा. सभापती जि.प. बीड)मा. डॉ. नरेंद्रजी काळे (प्रदेशाध्यक्ष पदवीधर मतदार संघटना) ,
अमर देशमुख (तालुकाध्यक्ष अंबाजोगाई श.प.)
अभिजीत लोमटे तालुकाध्यक्ष कांग्रेस,
असिफोद्दीन खतीब शहराध्यक्ष कॉग्रेस,
एड.शहरयार खान,गोविद भारत,व्यंकटेश चामणर,
प्रमोद मधुकर टेकाळे,एड. प्रशांत एम. पवार,एड.चामणर,
संतोष इंगोले,श्रीमती देशमुख चंद्रकला,
दिपक वसंतराव शिंदे यांच्या सह्या आहेत.
याच्या प्रतिलिपी
. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.
२) मा. ना. अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड जिल्हा.
३) मा. ना. दत्तामामा भरणे साहेब, कृषीमंत्री महाराष्ट्र राज्य.
यांना देण्यात आल्या आहेत. या मोर्चात हजारो महिला-पुरुष ,कार्यकर्ते सामील झाले होते.