स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने “ऑपरेशन थंडर” मोहिमे अंतर्गत 12 किलो 186 ग्रॅम गांजा केला जप्त आरोपी अटक
अंबाजोगाई ( प्रतिनिधी )
बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी आदेश देऊन ही अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुर परिसरात आजही अवैध धंदे सुरू असून यासंदर्भात बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहिती मिळाल्या वरून “ऑपरेशन थंडर या मोहिमे अंतर्गत घाटनांदुर येथे आज पहाटे 12 किलो186 ग्रॅम गांजा जप्त केला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
याविषयी प्राप्त माहिती अशी की
बीड जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील गुंडगिरी व अवैध धंद्यावर कार्यवाही करण्यासाठी सर्व पोलीस स्टेशनला सक्त सूचना करूनही आंबेजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या घाटनांदुर व परिसरात मोठ्या प्रमाणावर आजही अवैध धंदे सुरू असून यासंदर्भात
08 ऑक्टोंबर 2025 रोजीचे पहाटे 01:05 वाजन्याच्या दरम्यान बीड येथील स्थानिक गन्हे शाखेचे पथक अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुर येथे गस्त करीत असताना या पथकास गुप्त माहिती मिळाली की निहाल रामभाऊ गंगणे राहणार घाटनांदुर रेल्वे पटरी पुढे अण्णाभाऊ साठे चौक जवळ मोंढा विभाग घाटनांदुर याने त्याच्या घरी बेकायदेशीर रित्या अमली पदार्थ गांजाचा साठा करून ठेवला आहे. या गुप्त माहितीच्या आधाराने
बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, उप विभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शना खाली हवालदार1429 रामचंद्र केकान 837/ राख.989 विष्णू सानप .1837 दिलीप गीते व पो.ना 1918 गोविंद भताने या पथकाने त्याच्या घराची पंचा समक्ष झडती घेतली असता त्याच्या घरातून 12 किलो 186 ग्रॅम गांजा, कि.रु. ज्याची किंमत 2,43,720/- रू हा मुद्देमाल अंमली पदार्थ मिळून आला.
याचा पंचनामा करून कारवाई करण्यात आली आसुन अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाणे येथे पो.हवा./1429 रामचंद्र केकान गुन्हे शाखा याचे फिर्यादीवरून आरोपी निहाल रामभाऊ गंगणे याचे विरुद्ध
गु र न 0334/2025 कलम 8(c), 20(b) NDPS ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आसुन आरोपीस अटक करण्यात आले आसुन पुढील तपास अंबाजोगाई ग्रामीण पोलीस करत आहेत.