परभणी प्रतिनिधी :
जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी संस्थान इटोली परिसरात मंगळवार (दि.१४) रोजी एका गंभीर घटनेची नोंद झालीय. या घटनेने संपूर्ण परभणी जिल्हा सुन्न झालाय. झाडाखाली गप्पा मारत बसलेल्या तरुणीजवळ अचानक ६ जण आले. तिच्यासोबत असलेल्या तरुणाला पकडून ठेवलं त्यातील ३ जणांनी तरुणीवर सामूहिक अत्याचार केला व या घटनेचा व्हिडिओ ही चित्रित केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत ६ नराधमांना अटक केली आहे.
घटनेच्या तपासानुसार, १४ ऑक्टोबर रोजी तरुणी आणि तिचा मित्र झाडाखाली बसून गप्पा मारत होते. यावेळी करण, शेषेराव, साबेर, मुन्या, अर्जुन आणि लखन हे ६ जण अचानक त्या ठिकाणी आले. अर्जुन आणि लखन यांनी तरुणाला पकडून ठेवले, तर करण, शेषेराव आणि साबेर यांनी तरुणीवर सामूहिक अत्याचार केला. या घटनेचा व्हिडिओ काढला. घटना समजताच जिंतूर पोलिसांनी त्वरित कारवाई सुरू केली. १४ ऑक्टोबर रोजी ही घटना परभणीच्या जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी संस्थान इटोली परिसरात घडली असून या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी सतर्कता बाळगत पीडित तरुणीला विश्वासात घेवून गुन्हा दाखल केला आणि ६ आरोपींना अटक केली आहे. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी मंदिर इटोली शिवारात हा प्रकार घडला आहे.