अंबाजोगाई प्रतिनिधी : देशभरातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी दरवर्षी १९ मार्च रोजी विविध उपक्रम राबविण्यात येतात. याच पार्श्वभूमीवर यंदाही विविध सामाजिक व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्याची माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.
या पत्रकार परिषदेत आयोजकांनी सांगितले की, शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर असून समाजातील सर्व घटकांनी याकडे संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे. या निमित्ताने सहवेदना व्यक्त करत जनजागृती, चर्चा सत्रे तसेच सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
तसेच या उपक्रमांना अधिक व्यापक प्रतिसाद मिळावा यासाठी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व प्रसारमाध्यमांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.
१९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलन निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम कोणत्याही राजकीय पक्षाने आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम नाही. केवळ देशभरात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अतिशय संवेदनशील असा विषय घेऊन मागील दहा वर्षांपासून अन्नत्याग आंदोलन निमित्ताने लोकसहभागातून आम्ही हे सर्व उपक्रम राबवत आहोत. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सर्व उपक्रमात या विभागातील नागरीकांनी उस्त्फु्र्तपणे आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन या कार्यक्रमाचे संयोजक सुदर्शन रापतवार, अमर हबीब, कालिदास आपेट, आच्चूतबापू गंगणे, ऍड. संतोष पवार, माजी सरपंच वसंत मोरे, प्रा. पंडित कराड, गोरख शेंद्रे, डॉ. सुरेश आरसुडे, अच्चूत गंगणे, संतोष बोबडे, प्रा. शैलजा बरुरे,लखन होके, कल्याणराव भगत, रेखा देशमुख, आदिंनी केले आहे.
