“न्यूज लोकमन”च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील गायक-गायिकांना सुवर्णसंधी
अंबाजोगाई प्रतिनिधी : “न्यूज लोकमन”च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील गायक-गायिकांसाठी राज्यस्तरीय कराओके फिल्मी गीत गायन स्पर्धा–२०२६ आयोजित करण्यात आली आहे. सुरांच्या या महासंग्रामाचे आयोजन रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी अंबाजोगाई येथील श्री. मुकुंदराज स्वामी सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले आहे. स्पर्धेला सकाळी १० वाजता सुरुवात होणार आहे.
गायनाची आवड असलेल्या आणि आपल्या आवाजाच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण करू इच्छिणाऱ्या कलाकारांसाठी ही स्पर्धा मोठी संधी ठरणार आहे. स्पर्धकांना ४ ते ५ मिनिटांच्या कालावधीत आपले गायन सादर करावे लागणार असून, सहभागी होण्यासाठी वयाची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. प्रवेश शुल्क ₹५०० आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे.
आकर्षक पारितोषिके
स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि ₹११ हजार रोख, द्वितीय क्रमांकास सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ₹७ हजार रोख, तर तृतीय क्रमांकास सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ₹५ हजार रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच उत्तेजनार्थ तीन पारितोषिके प्रत्येकी ₹१ हजार रोख देण्यात येणार आहेत.
नोंदणीसाठी मर्यादित प्रवेश
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आपले नाव, गाव आणि संपूर्ण पत्ता व्हॉट्सॲपवर पाठवावा. नोंदणी शुल्क भरल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट ८६६९८६८४६८ या क्रमांकावर पाठविण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
संपर्क :
📞 ८६६९८६८४६८
📞 ९६५७०६०६५७
“एक कलाकार… एक गीत… एक संधी… आणि राज्यस्तरीय व्यासपीठ!” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी प्रवेश मर्यादित असून, प्रथम नोंदणी करणाऱ्या स्पर्धकांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील इच्छुक गायक-गायिकांनी आजच आपली नोंदणी करून या राज्यस्तरीय व्यासपीठावर आपल्या सुरांची छाप उमटवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
“न्यूज लोकमन” — कलाकारांच्या कलेचा सन्मान!
