वडवणी प्रतिनिधी :–वडवणी तालुक्यातील चिखलबीड परिसरातील एका डोंगरात ४० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा व्हागाडे घटनास्थळी गेल्या असून मृतदेह डोंगरातून बाहेर काढण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.पोलिसांच्या वर्तविलेल्या अंदाजानुसार घातपाताची शक्यता असल्याचे कळते.सध्या वडवणी पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
शाहीबाई चौरे (वय-४०,तुकोबाचीवाडी) असे मयत महिलेचे नाव आहे.शाहीबाई चौरे हे चिखलबीड परिसरात कश्या गेल्या?त्या परिसरातील डोंगरात मृतदेह कधीपासून आहे?घातपात करण्यामागे कोण?याचा देखील तपास वडवणी पोलिसांकडून सुरु असून गळ्याभोवती दोरीचे वण आढळल्याने यामागे खुनाची दाट शक्यता वर्तविण्यात यात आहे.दरम्यान पोलिसांच्या तपासातून खरा प्रकार लवकरच समोर येईल अशी प्रतिक्रिया प्रभारी अधिकारी वर्षा व्हागडे यांनी ‘प्रजापत्र’ ला दिली आहे.
