वृद्ध महिलेची हत्या करून मृतदेह घरातच जाळला…
अहिल्यादेवी नगर प्रतिनिधी: –
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे गुरुवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. या अत्यंत धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. किसनाबाई छगन मैदड (वय 75) या वृद्ध महिलेची हत्या करून, गुन्हेगाराने तिचा मृतदेह घरातच जाळून टाकल्याची माहिती समोर आली आहे. हत्येचे कारण अद्याप उघडकीस आलेले नाही, मात्र या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ
उडाली आहे घटनास्थळी तपास करत असताना, मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी प्राथमिक तपासात असा अंदाज व्यक्त केला आहे की, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गुन्हेगाराने मृतदेह घरातच जाळून टाकला. दरम्यान यामध्ये एक धक्कादायक बाब म्हणजे घरात कोणत्याही प्रकारची चोरी झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत. त्यामुळे ही हत्या केवळ चोरीसाठी झाली नसल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.ही हत्या कोणी केली ? हत्या करण्यामागे नेमके कारण कोणते आहे? याचा पोलीस शोध घेत आहेत. परंतु या घटनेने अहिल्यानगर जिल्हा हादरला आहे. नागरिकांमध्ये मोठं भीतीचं वातावरण असल्याची माहिती मिळतेय. पोलीस घटनेचा पुढील तपास करीत आहेत.