चोराचा पाठलाग करणाऱ्या पतीचा मंगळसूत्र चोरट्यांनी दगडाने ठेचला चेहरा… रेल्वे स्टेशन वरील धक्कादायक घटना… रेल्वे सुरक्षेवर प्रश्न चिन्ह?
अकोला प्रतिनिधी : काल अकोला रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर धक्कादायक घटना घडली असून अकोल्यात रेल्वेची सुरक्षा करणारे आरपीएफ आणि जीआरपी यांचा कर्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करणाऱ्या पतीला मंगळसूत्र चोरट्यांनी बेदम मारहाण करीत पूर्ण चेहरा दगडाने ठेचून काढलाय. हेमंत गावंडे वय वर्ष (३०) असे मारहाण करण्यात आलेल्या युवकाचे नाव असून तो आपल्या पत्नीसोबत गावावरून अकोला आला असता हा प्रकार घडला. सध्या त्याच्यावर अकोल्याच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर मंगळसूत्र चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून पळ काढला होता. त्यानंतर महिलेचा पती हेमंत गावंडे यांनी मंगळसूत्र चोरट्यांचा पाठलाग केला. याच दरम्यान चोरट्यांनी गावंडे यांना बेदम मारहाण केली, इतकेच नाही तर त्यांचा चेहरा देखील दगड ठेचून काढलाय.. काल रात्री उशिरा अकोला रेल्वे स्थानक परिसरात ही घटना घडली. सद्यस्थित हेमंत गावंडे यांचे प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अकोला रेल्वे स्थानकावर भेट देत पाहणी केली.
तसेच मंगळसूत्र चोरट्याच्या शोधार्थ पथक गठीत कले असून रवाना केले. दरम्यान या घटनेने रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्न उपस्थित होतोय? रेल्वे स्थानक परिसरात एवढी मोठी घटना घडते, त्यामुळे येथील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न निर्माण होतो आहे.
नेमकं काय घडलं होतं?
काल 16 मार्च रोजी रात्री पावणेदहा वाजता सुमारास अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर गावंडे नामक महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी पळ काढला होता. या चोरट्यांचा पाठलाग महिलेचे पती हेमंत गावंडे यांनी केला.. काही अंतरावर पाठलाग करत असताना चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. यादरम्यान गावंडे यांना बेदम मारहाण झाली, तसेच दगडाने त्यांचा चेहरा देखील ठेचून काढला आहे..
घटनास्थळावर ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते.. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपचारासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून पोलीस या घटनेचा गांभीर्याने तपास करतायेत. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुळकर्णी, अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, स्थानिक पोलिसांचे पथकही दाखल झाले होते.