बहिण कल्याणी बुडताना भाऊ करनचा जोरजोराने आक्रोश,,,,!
चनई परिसरात पसरली शोककळा, बालनिकेतन सेमी इंग्लिश स्कूल ची वीद्यार्थिनी,,,!
दिनांक 22 /9/ 2024 रोजी सकाळी 07: 15 वाजता चनई तालुका आंबेजोगाई येथील अहिल्यादेवी होळकर चौकात राहणाऱ्या बालनिकेतन सेमी इंग्लिश स्कूल मध्ये इयत्ता सातवीत शिकणाऱ्या कु. कल्याणी कानबा गोचडे वय 14 वर्ष हिचा आजोबाच्या शेतात पोहायला शिकण्यासाठी गेल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला असून, आंबेजोगाई शहर पोलिसात अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
दिनांक 22 9 2024 रोजी सकाळी सव्वासात वाजता सातवीच्या वर्गात शिकणारी बालनिकेतन इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी कु.कल्याणी गोचडे नेहमीप्रमाणे आपले आजोबा अर्जुन गोचडे वय 50 वर्ष यांच्या शेतात सर्व क्रमांक 551 मध्ये धनगर खोपा शिवारात पोहायला शिकण्यासाठी आपल्या भाऊ करण सह गेली होती. गेल्या दोन दिवसाच्या पावसाने पाणी विहिरीमध्ये 40 फुटापर्यंत आले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने कल्याणी पोहण्यासाठी उडी घेतली ती बाहेर आलीच नाही. तिचा भाऊ करण त्याने जोरात आरडाओरडा केला. बाजूलाच गोट्यात शेण काढत असलेले आजोबा अर्जुन भोसले हे धावत आले. व त्यांनी विहिरीत दोन-तीन मोटारी लावून पाणी उपसून घटनास्थळी शहर पोलीस घोळवे व पोलीस निरीक्षक कांदे साहेब हे घटना समजताच धावून आले होते. त्यांच्या समक्ष पाण्यात मोटारी लावून पाणी उपसून जमलेल्या नागरिकांनी व पोलिसांनी मृतदेह पाण्या बाहेर काढला व पंचनामा करून शवविच्छेदनासाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात मृतदेह दिला असून आंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून
याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कांदे साहेब हे करत आहेत.