स्वतःला मी म्हणजे सबकुछ समजणारे मतदार राजाला गृहीत धरणारे डिजिटल मीडियाची आम्हाला गरज नाही असे ठणकावून सांगणारे नंदकिशोर मुंदडा त्यांना जागा महामानवांच्या फोटो बरोबर कधी मिळाली हा संशोधनाचा विषय आहे. त्यांनी लावलेला फोटो पाहिला नसेल का ,,,? त्यांनी तो फोटो का उतरवला नाही,,,? त्यांना एवढी कशाची खुंुकुंुुमी आहे ,,,???? एक ना असे अनेक प्रश्न केज विधानसभेतील अर्थात आंबेजोगाई येथील नागरिकांना पडले असून, विधानसभेला मात्र त्यांची जागा त्यांना आम्ही दाखवणार आहोत अशा चर्चेला मात्र आंबेजोगाई शहरात उधाण आल्याचे दिसत आहे. यांचे फोटो जोगाईवाडी ग्रामपंचायत मध्ये महामानवान बरोबर व्हिडिओद्वारे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने, महामानवांचे अनुयायी व सर्व पक्षातील राजकीय पदाधिकारी यांनी नंदकिशोर मुंदडा यांचा भला मोठा महामानवाशेजारी फोटो असल्याने अनुयायांच्या भावना दुखवल्याने ग्रामपंचायत विरोधात कठोर कारवाई करण्यासाठीचे निवेदन उपजिल्हाधिकारी कार्यालय व गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना दिलेल असून, जर यावर तात्काळ कार्यवाही नाही केली. तर खूप मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे .
आंबेजोगाई तालुक्यातील मौजे जोगाईवाडी ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय नियमानुसार जो राष्ट्रीय महापुरुष व स्वतंत्र सेनानी यांचा प्रतिमा लावण्याचा नियम आहे. परंतु सदर महापुरुषांच्या तैलचित्रासोबत समाविष्ट नसलेले व नियमबाह्य स्वर्गीय मंत्री विमलताई मुंदडा यांची प्रतिमा महात्मा गांधी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या मधोमध प्रतिमा बसवण्यात आली आहे. तसेच सदर प्रतिमेच्या खाली सर्वप्रथम महामानवांपेक्षा मोठा फोटो नंदकिशोर मुंदडा यांचा बसविण्यात आला आहे. सदर बाब व्हिडिओ शूटिंग व फोटोमध्ये कैद झाली असून अशाप्रकारे महापुरुषांच्या बरोबरीने राजकीय लोकांचे नियमबाह्य प्रतिमा लावल्याने महापुरुषांचे अनुयायी यांच्या प्रचंड भावना दुखावल्या असून, सदर प्रकरणी दोषी ग्रामपंचायतचे सर्व जबाबदार पदाधिकारी कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निवेदन आज दिनांक 24 9 2024 रोजी वार मंगळवार गट विकास अधिकारी पंचायत समिती व उपजिल्हाधिकारी कार्यालय आंबेजोगाई यांना आंबेजोगाई येथील अनुयायांनी निवेदन दिले असून, निवेदनावर सर्व अनुयायांच्या सह्या आहेत.