हनुमान नगर च्या दांडिया उत्सवात लहान-पौढ महिला पुरूष मंडळींनी सहभाग घ्यावा- अध्यक्ष बालाजी खैरमोडे
अंबाजोगाई (प्रतिनिधी)*
हनुमान नगर मधील छञपती गणेश मंडळाच्या वतीने प्रथमच नवरात्र दांडिया उत्सव साजरा केला जात असून दांडिया उत्सवाच्या अध्यक्षपदी बालाजी खैरमोडे,उपाध्यक्ष अक्षय कदम, सचिव-अभिषेक पाटील, कोषाध्यक्ष-शंकर भिसे यांची निवड करण्यात आली आहे.*
प्रसिध्दी साठी केलेल्या पोस्ट मध्ये बालाजी खैरमोडे यांनी म्हटले आहे की,पहिल्याच वर्षी ही धुरा माझ्या खांद्यावर दिली आहे.त्यामुळे उत्सवाची जोरदार तयारी सुरू असून हनुमान नगर व हावळे गल्लीतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.दांडिया उत्सवात भाग घेण्यासाठी महिला तसेच पुरूष मंडळी सरसावली आहे.पारितोषिक (प्रौढ गट)प्रथम – 3001,व्दितीय 2001,तृतीय -1001,उत्तेजनार्थ (3)
*पारितोषिक छोटा गट (12 वर्षाखालील )* प्रथम-2100,व्दितीय-1500,तृतीय1001उत्तेजनार्थ (3) पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.दांडिया मध्ये भाग घेणाऱ्यांसाठी मोठा गट 100 रुपये व छोटा गट 50 रुपये अशी पास ची फीस ठेवण्यात आली असून जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन अध्यक्ष बालाजी खैरमोडे यांनी केले आहे.