जि प प्रा शा मांडवा पठाण येथील शिक्षिका दिपाली काठी (पिंगळे) यांचा सेवानिवृत्ती समारंभ संपन्न*
अंबाजोगाई(प्रतिनिधी):- अंबाजोगाई तालुक्यातील मांडवा पठाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असणाऱ्या सहशिक्षिका श्रीमती दिपाली काठी पिंगळे या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या सेवा निवृत्तीमुळे रविवार पेठ मधील सर्व शिक्षकांच्या वतीने त्यांचा सेवानिवृत्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मधुकर सुवर्णकार, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद बीड शिक्षण विभागाचे वर्ग दोन अधीक्षक रंगनाथ राऊत, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती मुमताज पठाण, भावठाणा केंद्राचे केंद्रप्रमुख चंद्रकांत साबळे, शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयदादा रापतवार, रामराव मुंडे, रविवार पेठ केंद्राचे केंद्रप्रमुख उत्तरेश्वर मिटकरी इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी श्रीमती पिंगळे यानी त्यांच्या आयुष्यातील ३८ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेचा ओहापोह केला.आपल्या सेवा कालखंडात आपणास अनेक कटू व चांगले अनुभव अनुभवयास मिळाले. या अनुभवाच्या प्रेरणेने आपणास बळ मिळून ते बळ आपण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडण याकरिता खर्च केले. आपल्या शैक्षणिक आयुष्यात शेकडो विद्यार्थी उत्तमरीत्या घडले गेल्याचा आपणास सार्थ अभिमान असल्याचे श्रीमती पिंगळे यांनी याप्रसंगी सांगितले.
श्रीमती पिंगळे यांना मिळालेल्या विविध पुरस्कारा बद्दल तसेच त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक,सामाजिक कार्याचा उल्लेख करत त्यांच्या भावी आयुष्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आयोजन रविवार पेठ केंद्रातील समस्त शिक्षकवृंदानी अतिशय उत्तमरीत्या केले. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन श्रीमती मंजुषा महाजन मॅडम यांनी केले, तर उपसस्थितांचे आभार संजीव उमाप यांनी व्यक्त केले.यावेळी शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवारांसोबतच सामाजिक व अन्य क्षेत्रातील सहकारी व नातेवाईक या कार्यक्रमास उपस्थित होते.