अंबाजोगाई शहरातील महिलांसाठी प्रियदर्शनी क्रीडा मंडळाच्या वतीने दांडिया फेस्टिव्हल -२०२४ चे आयोजन स्पर्धेच्या मुख्य बक्षीस वितरण सोहळ्यात “सुप्रसिद्ध अभिनेत्री तुझ्यात जीव रंगला फेम अक्षया देवधर” यांची प्रमुख उपस्थिती लक्षणीय ठरणार शहरातील जास्तीत जास्त दांडिया (गरबा)प्रेमींनी या फेस्टिव्हल मध्ये सहभागी व्हावे- संकेत मोदी
अंबाजोगाई(प्रतिनिधी):- अंबाजोगाई शहर हे सामाजिक व सांस्कृतिक परंपरा जोपासनारे शहर म्हणून ओळखल्या जाते. असाच सामाजिक सलोखा व संस्कृती जोपासण्याचे काम शहरातील प्रियदर्शनी क्रीडा, सांस्कृतिक मंडळ मागील अनेक वर्षांपासून करत आहे. शहरात होणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या दरम्यान अंबाजोगाई दांडिया (गरबा) महोत्सवाचे आयोजन प्रियदर्शनी क्रीडा मंडळ व रोटरॅक्ट क्लब ऑफ अंबाजोगाई यांच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेचा मुख्य बक्षीस वितरण सोहळा हा सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री तुझ्यात जिव रंगला फेम अक्षया देवधर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न होणार असल्याचे मुख्य संयोजक संकेत राजकिशोर मोदी यांनी दिली आहे. शहरातील जास्तीत जास्त दांडिया (गरबा) प्रेमींनी ढोल ताशा स्पर्धेप्रमाणेच दांडिया महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन देखील संकेत राजकिशोर मोदी यांनी केले आहे.
अंबाजोगाई शहरात प्रथमच सर्वात मोठ्या दांडिया (गरबा) फेस्टिव्हल-२०२४ चे आयोजन
प्रियदर्शनी क्रीडा सांस्कृतिक व्यायाम मंडळ आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ अंबाजोगाई यांच्या वतीने दिनांक ८,९,१० ऑक्टोबर २०२४ दरम्यान दररोज सायं ६ ते १० या वेळेत मोदी लर्निंग सेंटरच्या न्यू व्हिजन पब्लिक स्कूल, रिंग रोड अंबाजोगाई येथील भव्य प्रांगणात करण्यात आले आहे. या उत्सवात नवरात्र निमित्त देवीचा जागर करून अंबाजोगाई दांडिया फेस्टिवल मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे.
या अंबाजोगाई दांडिया (गरबा) फेस्टिवलचे वैशिष्ट्ये म्हणजे या उत्सवात मुली, महिला , (कपल) जोडी आणि १४ वर्षाखालील मुलांनाच प्रवेश दिला जाणार आहे. पुरुषांना महिला जोडीदार असल्याशिवाय पास किंवा प्रवेश मिळणार नाही. या दांडिया महोत्सवात सहभागी झालेल्या व विजेत्या स्पर्धकांना लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या स्पर्धेदरम्यान मुख्य बक्षिसांव्यतिरिक्त महिला स्पर्धकांस दररोज पैठणी, कपल स्पर्धकांस वॉच ( घड्याळ) त्याचबरोबर लहान मुलांना सन्मानचिन्ह देण्यात येणार आहेत. बक्षीस जिंकण्याची संधी देखील मिळणार आहे. दि १० ऑक्टोबर गुरुवार रोजी या दांडिया महोत्सवातील विजेत्या स्पर्धकांचा मुख्य बक्षीस वितरण सोहळा सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री अक्षया देवधर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न होणार आहे. मोदी लर्निंग सेंटर येथील नयनरम्य व सुरक्षित अशा खुल्या परिसरात हा गरबा उत्सव संपन्न होणार असून अंबाजोगाई शहरातून दांडिया खेळण्यासाठी व पुन्हा परत जाण्यासाठी मोफत बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या महोत्सवामध्ये सुप्रसिद्ध निवेदिका देखील सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर आकर्षक विद्युत रोषणाई, साऊंड आणि डेकोरेशन यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. रंगीलो गुजरात या दांडिया थीमसह विविध सेल्फी पॉईंट्स देखील या ठिकाणी तयार करण्यात येणार असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
स्पर्धेतील सर्व पासधारकांना मोफत दांडिया प्रशिक्षणाची सोय संयोजकांच्या वतीने केली गेली असल्याचे संयोजकांनी कळविले आहे. या महोत्सवात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी ४९९/- रुपये एवढे नाममात्र प्रवेशमूल्य ठेवण्यात आले असून या दांडिया महोत्सवात जास्तीत जास्त स्पर्धक व दांडियाप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन प्रियदर्शनी क्रीडा मंडळ व रोटरॅक्ट क्लब ऑफ अंबाजोगाई च्या वतीने करण्यात आले आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी रिलायन्स पेट्रोल पंप अंबाजोगाई, चायवाय कॅफे खोलेश्वर कॉलेज रोड अंबाजोगाई , शुभम लखेरा 8600634600, सचिन जाधव 9975171944 ,जतीन कर्नावट 9146993394 , मयूर परदेशी 7774017795, सोमेश्वर पाटील 9096379651 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.