अंबाजोगाई

*हनुमान नगर दांडियाचा स्तुत्य उपक्रम-संकेत मोदी*

अंबाजोगाई-शहरातील हनुमान नगर मधील छञपती गणेश मंडळ आयोजित नवराञ दांडिया उत्सवात *आदर नारी शक्तीचा* उपक्रम राबविण्यात येत असून दररोज 9 महिलेचा सत्कार केला जात आहे. खरोखरच महिलेंसाठी ही सन्मानाची बाब असून स्तुत्य उपक्रम आहे असे मत युवा नेते संकेत मोदी यांनी व्यक्त केले.

*हनुमान नगर येथील छञपती गणेश मंडळ आयोजित नवरात्र दांडिया उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून संकेत भैय्या मोदी यांच्या हस्ते अंबाजोगाई चे ग्राम दैवत श्री योगेश्वरी देवी व जगत जगदंबा तुळजा भवानी मातेची आरती करण्यात आली.यावेळी बोलतांना त्यांनी हनुमान नगर दांडिया च्या नारी शक्ती सन्मान उपक्रमास शुभेच्छा दिल्या.दररोज 9 महिलेंचा खण नारळ चोळी देवून सत्कार करण्याच्या सन्मान कार्यक्रमाचे कौतुकही केले.तसेच हनुमान नगर दांडियामध्ये सहभागी झालेल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. समयोचित वेळेत युवा कार्यकर्त्यांशी संवादही साधला.दरवर्षी दांडिया उत्सवात महिलांसाठी असेच सुंदर व महिलेंचा सन्मान व सत्कार उपक्रम राबविण्यात यावे अशा शुभेच्छा दिल्या.*
यावेळी कार्यक्रमास रील स्टार बकुळा फेम सोनाली राठोड,नाम्या देवा देवकते यांचीही विशेष उपस्थिती होती.सदरील दांडिया उत्सवाचे अध्यक्ष बालाजी खैरमोडे,उपाध्यक्ष अक्षय कदम, सचिव अभिषेक पाटील,शंकर भिसे, संजय गंभीरे,संजय सुर्यवंशी,संतोष बिचकुले,चेतन रामरूले,उत्तम हुलगुंडे आदींच्या हस्ते प्रमुख पाहूण्यांचा सत्कार संपन्न झाला.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छञपती गणेश मंडळांच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!