EVM VVPAT जनजागृतीने मतदार झाला जागृत
बीड प्रतिनिधी:-मा. आयोगाने राज्यभरामध्ये ईव्हिएम व व्हिव्हीपॅटचे प्रात्यक्षिक व प्रचार कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे व त्याबाबत सुचना दिलेल्या आहेत . सदर सुचनेच्या अनुषंगाने व जिल्हाधिकारी अविनाश पाठक व उपविभागीय अधिकारी बीड यांच्या मार्गदर्शनाखाली बीड मतदारसंघात ईव्हिएम व व्हिव्हीपॅटचे प्रात्यक्षिक दाखविणे , प्रचार व जनजागृती राबविण्यात येत आहे.
याप्रसंगी महसूल विभागाचे तलाठी व पी बी एरंडे , मास्टर ट्रेनर व त्यांचे सहकारी यांनी गावोगावी जाऊन यांनी प्रात्यक्षिक दाखवले . यावेळी अनेक नागरिक यांनी ईव्हीएम मशीन कशी असते व मतदान कसे करावयाचे याबाबत प्रशिक्षण घेतले.
*स्वीप कार्यक्रमच्या अनुषंगाने मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन* :
विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने मतदारांमध्ये जनजागृती होण्यासाठी बीड विधानसभा मतदार संघाकरिता स्वीप नोडल अधिकारी म्हणुन गट शिक्षणाधिकारी एस एच खान , पंचायत समिती बीड यांची नियुक्ती करण्यात आली आहे . मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून ठिकठिकाणी जनजागृती करुन मतदान टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत . त्याचाच एक भाग म्हणून दि 04.10.2024 रोजी छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल या ठिकाणाहून निघाली ती बलभीम चौक माळीवेस सुभाष रोड अण्णाभाऊ साठे मार्गे समारोप छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल मध्येच करण्यात आला. यामध्ये सुमारे 900 विद्यार्थी सायकल रॅलीमध्ये सहभागी होते. सदर रॅलीस मा.श्री ओंकार देशमुख जिल्हा पुरवठा अधिकारी तथा जिल्हा SVEEP नोडल अधिकारी व भगवान फुलारी शिक्षण अधिकारी प्राथमिक यांनी हिरवा झेंडा दाखवला. याप्रसंगी संजय पंचगले शिक्षण अधिकारी योजना, तुकाराम जाधव ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी , तसेच सहभागी झालेल्या शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य उपस्थित होते. सदर रॅलीमध्ये बीड विधानसभा मतदारसंघातील मतदारांची जनजागृती करण्यासंदर्भात घोषवाक्य,घोषणा इत्यादी देण्यात आल्या व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रेरित करण्यात आले. सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.