योगेश्वरी मातेचा आशिर्वाद माझ्या जीवनात महत्वाचा, मेट्रो शहराच्या धर्तीवर अंबाजोगाईला घेवुन जाण्याचा संकल्प-आ.नमिताताई मुंदडा
अंबाजोगाई(प्रतिनिधी)-राजकारणापेक्षाही योगेश्वरी माता देवीचा आशिर्वाद माझ्या वैयक्तिक जीवनात महत्वाचा असुन लग्नापुर्वी पहिल्यांदा शहरात आल्याबरोबर मंदिराचा उंबरठा ओलांडताना मला काही प्रश्न मनात पडले होते. कालांतराने सर्व गोष्टीचा साक्षात्कार होताना देवी जिथे वास्तव्याला त्या शहराचाच बदल करण्याची संधी मला मिळाली. जे मनात आलं ते करताना अवघ्या दोन वर्षात मंदिर परिसरातील मुलभुत पाया सुविधासाठी पाच कोटी रूपायाचा निधी मंजुर करून आणला. यापेक्षा आगामी काळात मंदिर विश्वस्त, भाविक भक्तांना सोबत घेवुन 100 कोटीपेक्षा जास्त आराखडा तयार करून सर्वांगिण विकासाचं दालन इथे उघडल्याशिवाय मी रहाणार नाही. इतर तीर्थक्षेत्राच्या धर्तीवर योगेश्वरी मातेच्या मंदिराचा चेहरा बनवला जाणार एवढेच नव्हे तर अंबाजोगाई शहराचा संपुर्ण कायापालट करून हे शहर मुंबई-पुणे धर्तीवर भविष्यात ओळखले जावे हा माझा संकल्प असल्याचे प्रतिपादन आ.सौ.नमिताताई मुंदडा यांनी केले.
शासनाच्या सांस्कृतिक तीर्थ योजने अंतर्गत मंदिर विकासाच्या मुलभुत पाया सुविधांसाठी सुमारे 05 कोटी रूपायांचा निधी मंजुर झाल्यानंतर कामाच्या भुमिपुजनप्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी तहसिलदार तरंगे होते तर युवा नेते अक्षय मुंदडा, प्रवक्ते राम कुलकर्णी, मंदिर सचिव प्रा.अशोक लोमटे, कमलाकर दादा चौसाळकर, गिरधारीलाल भराडिया, शिरीष पांडे, नगरसेवक संजय गंभीरे, कमलाकर आण्णा कोपले, नारायण केंद्रे, मकरंद सोनेसांगवीकर, संजय लोणीकर, दिनेश परदेशी, उल्हास पांडे, बालाजी दौडतले, महादेव मस्के, सारंग पुजारी, सौ.गौरी जोशी आदी मान्यवरांसह देवल कमिटीच्या सदस्या आजी माजी यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक करताना सारंग पुजारी यांनी आ.नमिताताई मुंदडा यांनी पुढाकार घेतल्यामुळेच मंदिर विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आल्याचे सांगितले. भाजपाचे प्रदेश प्रवक्ते म्हणाले की, पाच कोटी मंदिर विकासासाठी निधी येण्याची पहिलीच गोष्ट असुन संपुर्ण श्रेय आमदारांना जातं. भविष्यात पाच कोटीचे 100 कोटी लागले तरी खेचुन आणण्याची क्षमता आमदार ताईमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात पुन्हा भाजपाचं सरकार येईल, सामान्य लोकांचा आशिर्वाद नमिताताई मुंदडा यांनाच मिळेल आणि मग पुन्हा मंंदिर विकासाचे दरवाजे खुलतील असा दावा कुलकर्णी यांनी केला. युवा नेते अक्षय मुंदडा यांनी भुमिका मांडताना या मतदारसंघात स्व.विमलताई मुंदडा यांनी केवळ विकासाचं राजकारण करावं एवढाच रस्ता दाखवला. तोच आदर्श समोर ठेवताना सामान्य माणुस हाच आमचा विकासाचा केंद्रबिंदु नेत्या पंकजाताई मुंडे आणि डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना मोठ्या प्रमाणावर निधी इथे आणला. विकासकामाच्या श्रेयामध्ये आम्ही कधीच जात नाहीत. पण विरोधक बिनबुडाचे आरोप करतात आणि फेक अकाऊंट सोशल मिडियावर टाकुन बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. हिंमत असेल तर समोर येवुन बोला असा सवालही त्यांनी केला. काही काळी थेट मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्ते असणारे आज कुणाचे कार्यकर्ते झाले असा राजकिय टोला अक्षय मुंदडांनी मारला. अध्यक्ष पदावरून बोलताना तहसिलदार तरंगे यांनी विकास निधी आमदाराच्या प्रयत्नातून आल्यानंतर मंदिर ट्रस्ट अध्यक्ष नात्याने आभार व्यक्त केले. आपल्या भाषणात पुढे बोलताना नमिताताई मुंदडांनी अंबाजोगाई शहराचा विकासाचा संकल्प जनतेच्या समोर मांडून योगेश्वरी मातेचा आशिर्वाद माझ्या वैयक्तिक जीवनासह राजकिय जीवनात महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. सुत्रसंचलन प्रकाश बोरगावकर यांनी केले तर आभार प्रदर्शन…………यांनी केले.