आंबेजोगाई (प्रतिनिधी)
आंबेजोगाईत शहर पोलिसांकडून पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांनी तयार केलेल्या दोन टीमने कॅफे हाऊस, शाळा, कॉलेज व इतर ठिकाणी धाडी टाकून, छेडछाड करणारे व टवाळखोर विद्यार्थी विद्यार्थिनींवर करडी नजर ठेवून, कायद्यान्वये कार्यवाही केली असून काहींना पालकासमक्ष समज देऊन सोडून देण्यात आले असून, कॅफे हाऊस बरोबरच लॉज वरही धाडीवर, धाडी टाकून कडक कार्यवाही केली जाईल, असा इशाराही प्रसिद्धी माध्यमातून शहर पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांनी दिला आहे.
मा. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, यांच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाने, कर्तव्यदक्ष आंबेजोगाई पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांच्या नियोजनामध्ये आंबेजोगाई शहर हद्दीत कॉलेज शाळा कॅफे हाऊस परिसरातील परिसरात दोन टीम तयार करून पोलीस निरीक्षक घोळवेंसह सपो निलंगेकर एससी घोळवे, वडकर एस. सी., पी. सी. नागरगोजे व इतर पोलीस कर्मचारी यांनी कसोटीने टवाळखोर व छेडछाडी करणाऱ्यांविरुद्ध कठोर मोहीम राबवली असून, शाळा कॉलेज महाविद्यालय कॅफे हाऊस या ठिकाणी आढळून आलेल्या विद्यार्थी मुला मुलींच्या पालकांना बोलावून त्यांच्या समक्ष, समज देऊन एकूण 13 टवाळखोरांवर महाराष्ट्र पोलीस अॅक्ट अन्वे कारवाई करण्यात आली असून, यापुढे कुठल्याही कॅफे चालकाची अथवा टवाळखोरांची गय केली जाणार नाही. त्याचबरोबर कॅफेमध्ये पडदे , पुरेसा उजेड, अथवा पडदे कंपार्टमेंट आढळून आल्यास, गुन्हेगारांना कायद्यान्वये कडक कारवाईला सामोरे जावे लागेल याप्रकारे मीडियाच्या माध्यमातून एक प्रकारचा इशाराच कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी विनोद घोळवे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला असून, प्रत्येक शाळा कॉलेज कॅफे हाऊस व लॉजवर देखील आठवड्यात दोन वेळा धाडी टाकून, कारवाई केली जाईल असे पत्रकारांशी बोलताना विनोद घोळवे यांनी सांगितले आहे.