हिंदु धर्माच्या विरोधात बोलण्यासाठी शरद पवारांची कार्यकर्त्यांना ट्रेनिंग – भाजप प्रवक्ते राम कुलकर्णींचा आरोप
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
विधानसभा निवडणुक डोळ्यांसमोर ठेवुन हिंदु धर्माच्या देवाधिकांचा जाहिर अपमान करा ज्यामुळे मुस्लिम बांधवांची एकगठ्ठा मतांची पेटी आपल्यालाच मिळणार हा राजकिय दुरदृष्टीकोन डोळ्यांसमोर ठेवत ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी आपल्या प्रमुख नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या विषयात खास ट्रेनिंग दिली आहे. त्यामुळेच त्यांचे नेते हिंदु धर्मियांच्या देवाधिकांचा जाहिर अपमान करीत असल्याची टिका भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भाजपाचे प्रदेश प्रवक्ते कुलकर्णी यांनी म्हटले की, निवडणुका जिंकण्यासाठी शरद पवारांचं राजकारण हे जातीपातीच्या चक्रव्युहात नेहमीच आडकलेलं दिसतं. वेगवेगळ्या विषयाचं राजकारण करीत मतांची एकगठ्ठा पेटी मिळविण्यासाठी त्यांनी राज्याच्या राजकारणात अनेकदा प्रयत्न केले. वास्तविक पहाता कुठली ही विचारधारा नसलेले नेते म्हणजे पवार साहेब असुन धोकाधडी हाच खरा त्यांचा पक्ष आणि विचार. खरं तर राष्ट्रीय काँग्रेसला त्यांच्या विचारांचा चांगला अनुभव यापुर्वी आलेलाच आहे. काहीही करावं पण, राज्याच्या सत्तेत बसावं. पुर्वेइतिहास पाहिला तर वसंतदादा पाटलांपासून अनेकांना त्यांनी दिलेले धक्के लोक विसरले नाहीत. ज्या हर्षवर्धन पाटलांना काल त्यांनी पक्ष प्रवेश दिला त्यांच्याच पितृसंस्थेला पवारांनी दिलेली वागणुक आत्मचिंतनाचा विषय ठरू शकतो. उद्याच्या विधानसभा निवडणुका दृष्टीक्षेपात ठेवत पवारांनी मविआ अंतर्गत वेगवेगळे डावपेच टाकायला सुरूवात केली. उबाठा नेते उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवा अशी आग्रही मागणी केल्यानंतर पवारांनी ठाकरेंना बायपास करीत थेट राहुल गांधी सोबतच सलगी वाढवली आणि ठाकरे सोबत राहिले नाही तरी काँग्रेस आणि आम्ही एकजीव कसे राहु ? हे सांगताना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडणुकीनंतर बघु असं म्हणत उद्धवजींना त्यांची जागा दाखवुन दिली. एवढेच काय तर खासदार सुप्रियाताई या लेकीचं वर्तमान स्थितीत राजकिय घडामोडीत वाढलेले प्रस्थ यावरून हाच सीएम पदाचा चेहरा भविष्य राजकिय घडामोडी लक्षात घेवुन पवार त्या निर्णयाला येतील अशी शंका घ्यायला हरकत नाही. खरं तर काँग्रेस पक्ष त्यांच्या भुमिकेपासुन नेहमीच सावध रहायला बघतो. तो भाग वेगळा. यात दुसरं असं की, राज्यात मुस्लिम बांधवांची मतं लोकसभेला एकगठ्ठा मिळाल्यापासून विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवत त्यांनी सुरू केलेले लांगुनचालन थेट हिंदु धर्माच्या अस्मितेवर होत असलेले हल्ले इथपर्यंत येवुन पोहोचतं. मागच्या काही दिवसांपासुन हिंदु धर्माच्या देवाधिकांचा जाहिर अपमान पवारांच्या साक्षीने केला जातो. ज्ञानेश महाराव यांनी प्रभु रामचंद्र आणि श्री स्वामी समर्थांच्या बाबतीत जाहिर वक्तव्य केलं. तेव्हा पवार साहेब समोर बसलेले होते. महारावांनी ज्ञानाचे दिवे पाजळले तरी पवारांनी मुग गिळले. काल हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशादरम्यान उत्तम जानकरांनी गणपती दारू पितो, तो भ्रष्ट असा जाहिर उल्लेख करून पुन्हा एकदा हिंदु धर्माच्या अस्मितेचा अपमान केला. तरीही पवारांनी मुग गिळुन जानकरांच्या वक्तव्याला दाद दिली. वास्तविक अक्कल नसणारे असे जानकर ट्रेनिंग मिळाली. म्हणुनच हिंदु धर्मियांच्या देवाधिकांवर बोलु लागले. जितेंद्र आव्हाडांपासून खा.कोल्हेपर्यंत ही सारी मंडळी पवारांनी हिंदु धर्माचा अपमान करण्यासाठी ट्रेनिंग दिलं. एवढेच काय तर दोन महिन्यांपुर्वी या सर्व प्रमुख पदाधिकार्यांचा दोन दिवस अभ्यास वर्ग केवळ हिंदु धर्माच्या देवाधिकांचा अपमान करण्यासाठीच घेतल्याचा आरोप राम कुलकर्णी यांनी केला. विशेष म्हणजे दुसर्या कुठल्या ही धर्माचा अपमान पवारांच्या कार्यकर्त्यांकडून केला जात नाही हे विशेष म्हणावे लागेल. असे भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी सांगितले.
- =======================
*नोट – बातमी सोबत फोटो.*
=======================