मुद्रांक (बॉण्ड) विक्रेत्यांकडून सर्वसामान्य जनतेची होणारी आर्थिक लूट तात्काळ थांबवावी या साठी आज अखिल भारतीय मराठा महासंघ मार्फत मा.उपविभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले.
अंबाजोगाई प्रतिनिधी:-
मुद्रांक (बॉण्ड) विक्रेत्यांकडून सर्वसामान्य जनतेची आर्थिक लूट मोठ्या प्रमाणात होत आहे. शासनाने नुकतेच 2024 मध्ये 100/- रूपयाचे मुद्रांक (बॉण्ड) बंद करून 500/- रूपयांचे मुद्रांक (बॉण्ड) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
आजपर्यंत 100 चा मुद्रांक (बॉण्ड) विक्रेत्यांकडून हा नियमबाह्य पद्धतीने 110/- रूपयाला विकला जात आहे. आता 500/- रूपयांचा मुद्रांक (बॉण्ड) देखील 550/, 530/- रूपयाला नियमबाह्य पद्धतीने विकला जातोय मुद्रांक (बॉण्ड) विक्रेत्यांकडून अधिकचे 50/- रूपये घेतले जातात.
दैनंदिन जीवनामध्ये मुद्रांक (बॉण्ड) चा उपयोग हा न्यायालय, कचेरी, रजिस्ट्री ऑफिस, तहसील कार्यालय,शैक्षणिक कार्यपद्धती व वेगवेगळी शपथपत्रे तयार करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात होतो.
बॉण्डची अधिकृत जी किंमत असेल ती जाहीर करून बॉण्ड विक्रेत्यांना शासनमान्य दरानुसारच विकण्यास बंधनकारक करावे व
सर्वसामान्यांची होणारी आर्थिक लूट तात्काळ थांबवावी.
या वेळीउपस्थित बीड जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख रंजीत डांगे,अकबर पठाण,लहू शिंदे, विजय चव्हाण,दादा केकाण सर,आबा देशमुख,ओम चव्हाण, सुधीर उफाडे व इतर…