अंबाजोगाईत १२ ऑक्टोबर रोजी धम्म महोत्सवाचे आयोजन भदन्त पय्यातिस्स, खा.डॉ.फौजिया खान यांची विशेष उपस्थिती चार सञ : बुध्द मूर्तीची प्रतिष्ठापना, धम्म प्रवचन, सभागृहाचे लोकार्पण, पुरस्कार वितरण, गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि बुद्ध भिमगीतांचा कार्यक्रम
अंबाजोगाई प्रतिनिधी:-
बुद्धिस्ट फाऊंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने शनिवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२४ रोजी नियोजित ‘विश्वशांती महाविहार’, ‘लुंबिनी पार्क’, मांडवा रोड, अंबाजोगाई (जि.बीड) येथे भव्य धम्म महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे हे ४ थे वर्ष आहे. या महोत्सवात आदरणीय भदन्त पय्यातिस्स (सिरसाळा) यांची धम्मदेसना – धम्मप्रवचन होणार आहे. तर उद्घाटक म्हणून खा.डॉ.फौजिया खान (सदस्य, राज्यसभा, नवी दिल्ली.) आणि समारोप सत्रात सौ.नमिताताई अक्षय मुंदडा (आमदार, केज विधानसभा) यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. धम्म महोत्सव धम्म ध्वजारोहण, उद्घाटन, बुध्द मूर्तीची प्रतिष्ठापना, धम्म प्रवचन, सभागृहाचे लोकार्पण, पुरस्कार वितरण, गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि बुद्ध भिमगीतांचा कार्यक्रम व मानवतावादी काव्य वाचन आणि समारोप अशा चार सञात होणार आहे. दरवर्षी धम्म उपासकांच्या योगदानातून अशोक विजयादशमी दिवशी म्हणजे धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचे औचित्य साधून “भव्य धम्म महोत्सव” घेण्याचे बौध्द उपासकांनी सर्वानुमते ठरवले आहे. महोत्सवात धम्म प्रेमी जनता व बौध्द उपासकांनी सहभागी होण्याचे आवाहन व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
शनिवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत (चार सत्रांमध्ये) नियोजित ‘विश्वशांती महाविहार’, ‘लुंबिनी पार्क’, मांडवा रोड, अंबाजोगाई (जि.बीड) येथे हा महोत्सव होईल. शनिवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० ते ११.३० या वेळेत पहिल्या सञात प्रसिद्ध गायक प्रा.शिवाजी कांबळे (परभणी) यांचा बुध्द भिमगितांचा प्रबोधनपर कार्यक्रम होईल. त्यानंतर सत्र दुसरे हे उद्घाटनाचे असेल सकाळी ११.३० ते दुपारी १.३० वाजता या वेळेत ध्वजारोहण, सभागृहाचे लोकार्पण, बुध्दमूर्ती प्रतिष्ठापना आणि शाम लक्ष्मण सरवदे (उत्कृष्ट समाजसेवक), संतोष राजाराम बनसोडे (उत्कृष्ट उद्योजक), अनिल शेषेराव बनसोडे (उत्कृष्ट उद्योजक), राजेंद्र राधाकिसन घोडके (धम्म मित्र), डी.एस.नरसिंगे (धम्म मित्र), प्राचार्य डॉ.जयपाल प्रभाकर कांबळे (उत्कृष्ट प्रशासन अधिकारी) या मान्यवरांना पुरस्कार वितरण करण्यात येईल. यावेळी खा.डॉ.फौजिया खान (सदस्य, राज्यसभा, नवी दिल्ली.) यांचे हस्ते धम्म महोत्सवाचे उद्घाटन होईल. तर उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा हे असतील. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, नगराध्यक्षा सिताताई बनसोड (केज नगरपंचायत), डॉ.नरेंद्र काळे (प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार.), ऍड.अनंतराव जगतकर (अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ, अंबाजोगाई.), सामाजिक कार्यकर्त्या डॉ.अंजलीताई घाडगे, प्रा.एस.के.जोगदंड (ज्येष्ठ नेते, अंबाजोगाई.), भाऊसाहेब राठोड (सरपंच, काळवटी तांडा), चंद्रशेखर वडमारे (उद्योजक, अंबाजोगाई) या मान्यवरांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. धम्म महोत्सवाचे तिसरे सञ हे धम्म प्रवचनाचे आहे, हे सञ दुपारी २ ते ४ या वेळेत होईल. यावेळेस आदरणीय भदन्त पय्यातिस्स (सिरसाळा) हे धम्म देसना देतील. आणि प्रमुख वक्ते दंगलकार नितिन चंदनशिवे (महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी व लेखक) यांच्या मानवतावादी कवितांचे वाचन होईल. या सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.सुरेश शेळके (फुले, शाहु, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, परभणी.) हे असतील. चौथे सत्र म्हणजे धम्म महोत्सवाचा समारोप होय, हे सञ दुपारी ४ वाजता सुरू होईल. समारोप सत्रास प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार सौ.नमिताताई मुंदडा (केज विधानसभा मतदारसंघ.) तर समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा.डी.जी.धाकडे (अध्यक्ष, बुद्धिस्ट फाऊंडेशन ऑफ इंडिया) हे असतील. समारोप सत्रात शैलेश कांबळे (जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, बीड.), डॉ.सिध्दार्थ टाकणखार (प्रदेश सचिव, ब.स.पा), महादु मस्के (माजी नगराध्यक्ष, अंबाजोगाई), दशरथ सोनवणे (तालुकाध्यक्ष, रिपाइं (ए), अंबाजोगाई ), महादेव आदमाने (माजी नगरसेवक, अंबाजोगाई), इंजि.प्रभाकर कांबळे (सेवानिवृत्त अभियंता), ऍड.माणिक आदमाने (राज्य सचिव, बी.आर.एस.पी.), आर.डी.जोगदंड (मास्टर ट्रेनर), शेख रहीम (माजी उपनगराध्यक्ष, अंबाजोगाई) या मान्यवरांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होईल. अंबाजोगाई बस स्थानक ते धम्म महोत्सवाच्या नियोजित ठिकाणी जाण्यासाठी सकाळी १० ते ११.३० आणि सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत एस.टी.बसची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तरी महोत्सवात धम्म प्रेमी जनता आणि बौध्द उपासकांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रमुख संयोजक प्रा.डी.जी.धाकडे, प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे, ऍड.सुनिल सौंदरमल, कबिरानंद कांबळे, डॉ.शंकर वाघमारे, उत्तम डोंगरे, राजेंद्र घोडके, प्रा.शिवाजीराव मांदळे, डॉ.सर्जेराव काशिद, अशोक भोजने, इंजि.विजयानंद बलाढ्ये, डॉ.गुलाबराव सिरसट यांच्या वतीने करण्यात येत आहे. तर धम्म महोत्सवाच्या यशस्वितेसाठी व्यवस्थापन समितीचे डॉ.राहुल धाकडे, सुखदेव भुंबे, आश्रुबा कांबळे, भगवान ढगे, डी.एन.आचार्य, डॉ.संतोष बोबडे, रमाकांत घाडगे, जीवन घाडगे, उज्जैन बनसोडे, डॉ.दिलीप गायकवाड, डॉ.एम.एच.कांबळे, प्राचार्य डॉ.एम.व्ही.कानेटकर, अशोक शेळके, डॉ.सुरेंद्र भिवगडे, विलास गायकवाड, साहेबराव (बापू) जोगदंड, सुर्यकांत जोगदंड, प्रा.अनंत कांबळे, बाबा गवळी, राजपाल जोगदंड, संभाजी सातपुते, मिलींद जोगदंड, रवि पोटभरे, धम्मपाल वैद्य, लंकेश वेडे, टोपाजी जोगदंड, व्यंकट वेडे, मल्हारी जोगदंड, शशीकांत सोनकांबळे, प्रियदर्शी मस्के, राजेश वाहुळे, भिमाशंकर शिंदे, ज्ञानोबा वैद्य, मनोज इंगळे, रविंद्र आचार्य, लक्ष्मण दासुद, अरूण रोडे, प्रा.आर.आर.तागडे, संतोष शिनगारे, भगवान जोगदंड, ऍड.किरण कांबळे, मारूती सरवदे, डॉ.नवनाथ सोनवणे, दादासाहेब कसबे, रमेश गायसमुद्रे, गौतम कांबळे, शोभा बनसोडे, ज्ञानोबा रोकडे, ललिता घोडके, अतुल ढगे, विशाल जोगदंड, सौ.सुनंदा भास्कर घाडगे, सौ.माया महादेव धावारे, सौ.शिल्पा सचिन गायकवाड, सौ.जयश्री वाव्हळ, प्रमोद जोगदंड, बापु सोनवणे, लखन हजारे, महादेव पोटभरे, संदिप रोडे, आनंद कांबळे, खाजामियाँ पठाण, माणिक भडके, विशाल सावंत, रघुनाथ जोगदंड, एस.एम.जोगदंड, प्रभाकर दहिरे, दयानंद कांबळे, विजय राऊत, अनिल चौरे, अतुल सिताप, त्रिंबक रोडे, संजय सुरवसे यांच्यासह सर्व सदस्यांनी पुढाकार घेतला आहे.