महाराष्ट्र शासन,सांस्कृतिक कार्य विभाग पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, बक्षीस वितरण मुंबई येथे आयोजित केला होता.
अंबाजोगाई प्रतिनिधी:-
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार २०२४
पारितोषिक वितरण समारंभ श्री. सुधीर मुनगंटीवार मा.मंत्री यांच्या हस्ते दिनांक ०९ ऑक्टोबर २०२४ यशवंत नाट्य मंदिर माटुंगा येथे पार पडला. यामध्ये बीड जिल्ह्यात प्रथम पारितोषिक सरस्वती गणेश मंडळ, गुरुवार पेठ,अंबाजोगाई यांना मिळाले.बक्षीस देताना श्री. सुधीर मुनगंटीवार मा.मंत्री,दीपक केसरकर,अनिल देसाई सदस्य लोकसभा,सदा सरवणकर सदस्य विधानसभा,सरस्वती गणेश मंडळाचे अध्यक्ष कुलदीप परदेशी,सचिव निलेश मुथा व इतर अनेक लोकांची उपस्थिती होती.सर्व लोकांकडून मंडळाच्या सर्व सदस्यांचे, पदाधिकाऱ्यांचे व सहकार्य केलेल्या अंबाजोगाई करांचे कौतुक केले जात आहे.
सरस्वती गणेश मंडळ च्या विविध देखावे,,दहा दिवस माणुसकीची भिंत उभी करून विविध लोकांना मदत मिळाली,सामाजिक क्षेत्र व सांस्कृतिक व आरास देखाव्यामध्ये जवळपास 40 वेगवेगळ्या प्रकारे कार्यक्रम घेतले,ते पुढील प्रमाणे
महिला बचत गटातून तयार झालेल्या लघुउद्योगातून शाडू मातीच्या पर्यावरण पूरक गणपती मूर्तीची स्थापना,माणुसकीची भिंत *नको असेल ते द्या..हवे असेल ते घ्या..*
500 झाडाची वृक्षारोपण केलेव आजीवन जोपासण्याची जबाबदारी परदेशी यांनी घेतली,सीबीसी,एल एफ टी,के एफ टी,शुगर मोफत रक्त तपासणी शिबिर, बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य, रक्त तपासनी शिबिर,रक्तदान शिबिर (रक्तदानात महिलांचा,व सर्व समाजाचा समावेश),क्रेडाई बांधकाम कामगारांना सेफ्टी रिफ्लेक्टर जॅकेट, हेल्मेट वाटप,रस्त्यावरील केरकचरा जमा करणारे ,नाल्या स्वच्छ करणारे, घंटा गाडी फिरविणारे,वीज पुरवठा करणारे लाईनमन यांना डिजिटल अलार्म वॉच व चुंबकीय माळ देवून कृतज्ञता सत्कार केला,ज्येष्ठांसाठी आधार काठी व चष्मा, दिव्यांगासाठी वॉकर व कुबडी आणि सगळ्यांना चुंबकीय माळ दिली,मतिमंद मुलींच्या विद्यालयात रंगभरण स्पर्धा,वृद्धाश्रम येथे अन्न दान,मनसोक्त गप्पा मारून त्यांचा आनंद द्विगुणीत केला,भटके श्वान व गायी यांना रिफ्लेक्टर बेल्ट बांधले, शुमा क्रिकेट अकॅडमी येथे मुलांना योग प्राणायाम शिबिर,मुदगल प्रशिक्षण शिबिर,पारंपारिक वाद्य स्पर्धा,पारंपारिक गायन स्पर्धा,
नाट्य स्पर्धा,पारंपारिक वेशभूषा घालून सामाजिक सलोखा वाढविण्याचा प्रयत्न केला,कबड्डी व खो खो स्पर्धा,जुनी नाणी दागिने नोटा यांचे प्रदर्शन,लक्ष्मीकांत बेर्डे,अशोक सराफ यांचे चित्रपट दाखवले, भारतीय सैनिकांवर चित्रफीत दाखवून लहान मुलांमध्ये व संरक्षण क्षेत्र करियर म्हणून निवडण्यास प्रोत्साहन दिले,गरजू प्रवाश्यांना बस स्टँड येथे महाप्रसाद वाटप,रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना सरकारी दवाखान्यात महाप्रसाद वाटप,वस्तीवरील लोकांना महाप्रसाद वाटप, प्रौढ बिसिजी लसीकरण मोहीमेत 60 वर्षांवरील मार्गदर्शन केले.शुगर पेशंट 18 वर्षांवरील नागरिकांना लसची जनजागृती केली, स्वप्नातील अंबाजोगाई जंक्शन स्टेशन आरास देखावा सादर केला व त्यास प्रचंड गर्दी होती,
रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेतांना स्वच्छतेसाठी ग्लोव्हज आणि कॅप वाटप, दर्शनी भागात पोस्टर्स लावून जनजागृती केली,महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम ठेवून 45 बक्षिसे ठेवली,महिला सुरक्षा आरास देखावा,महिला व्यसनमुक्ती बद्दल जनजागृती केली,हत्तीखाना येथे स्वच्छता अभियान,मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त 17 सप्टेंबर रोजी ऐतिहासिक अंबाजोगाई बुरुजावर जाऊन लहान मुलांना मराठवाडा कधी स्वतंत्र झाला याची माहिती दिली.वरील सर्व कार्यक्रम घेण्यासाठी सरस्वती गणेश मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी,सदस्यांनी अहोरात्र परिश्रम करून मेहनत घेतली.