अंबाजोगाई

श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवात नवमीच्या दिवशी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते विधिवत पूजा, होम हवन व पूर्णाहुती चार ते पाच लाख भाविकांनी श्री योगेश्वरी देवीचे घेतले दर्शन

अंबाजोगाई(प्रतिनिधी):- संपूर्ण महाराष्ट्रासह अंबाजोगाई शहराचे ग्रामदैवत माता श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र उत्सवाची सांगता अंबाजोगाई चे अप्पर जिल्हाधिकारी श्री व सौ अविनाश पाठक यांच्या हस्ते विधिवत पूजा होमहवन करून पूर्णाहुती देण्यात आली. या नवरात्र उत्सवादारम्यान राज्याच्या काना कोपऱ्यातुन जवळपास चार ते पाच लाख भाविकांनी श्री योगेश्वरी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला.महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास गुरुवारी घटस्थापनेने प्रारंभ झाली होती. आज देखील नवमीच्या दिवशी शुक्रवारी जिल्हाधिकारी अविनाश पाठक व त्यांच्या सौभाग्यवती यांनी विधिवत श्री. योगेश्वरी देवीची महापूजा , होमहवन व पूर्णाहुती संपन्न केली .या महापूजे दरम्यान व नंतर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

श्री योगेश्वरी देवीचे नवरात्र महोत्सव ३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत संपन्न झाला. नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून चार ते पाच लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी आले होते. त्या पार्श्वभूमीवर मंदिर सुरक्षा व्यवस्थेसाठी मंदिर प्रशासनाच्या व विश्वस्त मंडळाच्या वतीने ठोस उपाययोजना आखण्यात आली होती. लोकांचा वेळ वाचवा यासाठी विशेष पासची देखील मंदिर प्रशासनाच्या वतीने सोय करण्यात आली होती. या दरम्यान दररोज महाप्रसाद देखील भाविक भक्तांना पुरविण्यात आला होता. या महाप्रसादाचा लाभ देखील हजारो भाविकांनी घेतला.
शुक्रवारी गुरुवारी सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी अविनाश पाठक व त्यांच्या सौभाग्यवती यांनी विधिवत श्री. योगेश्वरी देवीची महापूजा केली. यावेळी पदसिद्ध अध्यक्ष तहसीलदार विलास तरंगे, मुख्याधिकारी प्रियंका टोंगे, देवल कमेटीचे उपाध्यक्ष राजकिशोर मोदी,सचिव अशोक लोमटे,ऍड विष्णुपंत सोळंके, कोषाध्यक्ष शिरीष पांडे, विश्वस्त संजय भोसले,प्रवीण दामा, हंसराज देशमुख, डॉ.संध्या जाधव,सतीश लोमटे,अमोल लोमटे, राजपाल भोसले, राजाभाऊ लोमटे,अमित चव्हाण, रवि कदम यांच्यासह मानाचे मानकरी, पुरोहित व भक्तांची उपस्थिती होती.
या नवरात्र महोत्सवात दररोज मंदिरात संगीत, भजन, कीर्तन,प्रवचन,व विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबविले गेले. भाविकांनी या सर्व कार्यक्रमाचा मोठया प्रमाणावर लाभ घेतला. शनिवारी दसऱ्यानिमित्त दुपारी १ वाजता श्री योगेश्वरी देवीची पालखी प्रतिवर्षी प्रमाणे शहरातील नियोजित मार्गावरून सीमोल्लंघनासाठी निघणार आहे. त्यामुळे देवीच्या पालखीचा सोहळा संपन्न करण्यासाठी सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन श्री योगेश्वरी देवल कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. त्याचबरोबर भाविकांनी या नवरात्र उत्सवादारम्यान केलेल्या सहकार्याबद्दल आलेल्या सर्व भाविक भक्तांचे आभार देखील मंदिर प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893842
error: Content is protected !!