अंबाजोगाई

काँग्रस पक्ष्याचे ऍड. अनंत जगतकर यांची कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी; लवकरच निर्णय

 

अंबाजोगाई (प्रतिनिधी):-

माझ्या कडे केज मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन असताना व मी बीड जिह्यातील काँग्रेस नेतृत्वासह वरिष्ठ नेत्याकडे पाठपुरावा करूनही माझ्या उमेदवारी साठी त्यांनी प्रयत्न केले नाहीत असा आरोप करून आपण काँग्रेस पक्षाचा त्याग करत आहोत अशी घोषणा काँग्रेसचे जेष्ठ नेते ऍड अनंतराव जगतकर यांनी केली.

या वेळी बोलताना ऍड अनंतराव जगतकर म्हणाले की, काँग्रेसचे विभागाजन झालं त्यावेळी काँग्रेस कडे चिट पाखरू राहील नव्हतं. त्यावेळी आम्ही 4 5 लोकांनी पुनर्बांधनी केली. 1985 ला विधानसभा तिकीट मिळालं अंतर्गत बंडाळी मुळे पराभव पत्करावा लागला. पूर्वी गॅस एजन्सी साठी अर्ज केला होता. तत्कालीन तहसीलदार पोफळकर यांनी बोलावून मला एजन्सी ला प्रवृत्त केलं. 1986 ला पाडव्याच्या शुभ प्रसंगी गॅस एजन्सी चालू केली.

मी काँग्रेसचा प्रदेश प्रतिनिधी आहे. माझ्या कडे केज मतदार संघाच्या विकासाचा मास्टर प्लॅन आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक लढवण्या संदर्भात अशोक पाटील यांचा कॉल आला. ऑगस्ट मध्ये नाना पटोले यांनी मला लातूर येथे विचारणा केली. त्या नंतर मुबंई मध्येही मी त्यांची भेट घेतली. मी नंतर सर्व्हे केला. मला उत्तम प्रतिसाद मिळाला. उमेदवारी साठी तयारी केली. मी शरदचंद्र पवार साहेबाना भेटलो. महाविकास आघाडीत काँग्रेसला एक तरी जागा सोडा म्हणून मागणी केली. तुमच्या नेत्याला बोलायला सांगा केज साठी आग्रह धरला नाही. नेते खुशाल आहेत, बीड जिल्ह्यात काँग्रेस संपुष्टात आला आहे. माझ्या सारखा व्यक्ती प्रवाहात राहिला मात्र काँग्रेस पक्षात राहून भवितव्य दिसत नाही, टिंगल टवाळीचा पक्ष झाला आहे.

कोणत्या पक्षाला पाठिंब्या द्यायच्या याचा निर्णय नंतर घेईल. यावेळी त्यांनी खा रजनी पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष तोफ डागत त्यांनी आज पर्यंत काँग्रेस पक्षाला पोषक परस्थिती निर्माण केलेली नाही. माझ्या उमेदवारी साठी काडीचेही प्रयत्न केलेले नाहीत. त्यांनी प्रयत्न केले असते तर केज मतदार संघ काँग्रेस पक्षाला सुटला असता मात्र ते प्रयत्न झाले नाहीत. म्हणून मी काँग्रेस पक्षाचा त्याग करत आहे. माझी ओळख काँग्रेस म्हणून आहे. उद्या राजीनामा पाठवत आसल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893839
error: Content is protected !!