अंबाजोगाई शहरांचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी व त्यांचा सहकाऱ्यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना जाहीर पाठिंबा
*मतदार संघातील जनमानसाच्या भावनांचा आदर व विचार करून पृथ्वीराज साठे यांचा विजयश्री खेचून आणणार:- राजकिशोर मोदी*
अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- केज मतदार संघातील जनमानसाच्या भावनांचा आदर व विचार करून अबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी त्याच्या अनेक सहकारी व कार्यकर्त्यांसह केज मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे यांना जाहिर पाठिंबा दिला आहे. राजकिशोर मोदी व त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांची बुधवार दि. 6 नोव्हेंबर रोजी आद्यकवी मुकुदराज सांस्कृतिक सभागृहात संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राजकिशोर मोदी यांच्यावर प्रेम करणारे दीड ते दोन हजार कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी बैठकीतील बहुतांश कार्यकर्त्यांनी पृथ्वीराज साठे याना साथ देवून त्याना प्रचंड बहुतमानी विजयी करण्याचा निश्चय केला. या संवाद बैठकीत राजकिशोर मोदी यांच्या सह दत्ता आबा पाटील, प्रा वसंत चव्हाण, रिकबचंद सोळंकी, बबन लोमटे, प्रकाश सोळकी, ऍड विष्णुपंत सोळंके,मनोज लखेरा, चंद्रशेखर वडमारे,महादेव आदमाने , दिनेश भराडीया , धम्मा सरवदे, संकेत मोदी, किशोर परदेशी, डॉ राजेश इंगोले, राजेंद्र मोरे, सुनील वाघाळकर,असद भाई, अशोक मोदी, हाजी खालेक ,अंकुश हेडे, परमेश्वर वाकडे, गोविंद पोतंगले , अशोक गंडले, अकबर पठाण,शाकेर काझी, दत्ता सरवदे, मोईन शेख, भाई वजीर शेख, रफिक गवळी यांच्यासह असंख्य सहकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या कार्यकर्ता संवाद बैठकीचे प्रस्ताविक माजी नगरसेवक महादेव आदमाणे यांनी केले. ही एक कौटुंबिक बैठक असल्याचे सांगत समाज किंवा मतदार कोणत्या विचाराचा आहे हे जानण्यासाठी ही बैठक घेण्यात आली असल्याचे महादेव आदमाणे यांनी सांगितले. जातीवादी लोकांसोबत जायचे की निरपेक्ष भावनेच्या लोकांसोबत थांबायचे याबाबत ही बैठक आयोजित केली असल्याचे देखील त्यांनी याप्रसंगी नमूद केले. आंबासहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दत्ता पाटील यांनी राजकिशोर मोदी जो निर्णय घेतील त्यास आपला संपूर्ण पाठिंबा असेल असे स्पष्ट केले. यावेळी डॉ राजेश इंगोले यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या शेरोशायरीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्यांनी विद्यमान आमदार यांच्यावर अप्रत्यक्ष पणे बोलताना तुमच्याकडे कसलेही कुलूप असले तरी चावी मात्र राजकिशोर मोदी व त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांकडे असल्याचे सांगितले. विकास म्हणजे केवळ रस्ते करणे नाल्या करणे हा नाही तर येथील सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी मोठे उद्योग क्षेत्र सुरू करणे , त्याचे दरडोई उत्पन्न वाढवीने अशा बाबींवर विकास अवलंबून असल्याचे डॉ राजेश इंगोले यांनी स्पस्ट केले.
सदरील बैठकीत हाजी
खालेक ,अकबर पठाण, ऍड दयानंद लोंढाळ, मुख्याध्यापक बळीराम जोगदंड, परमेश्वर वाकडे, किशोर परदेशी, ऍड विष्णुपंत सोळंकी, चंद्रशेखर वडमारे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. राजू मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले की स्वतः च्या विकासापेक्षा कार्यकर्त्यांचा विकासाला महत्व देणारा नेता असला पाहिजे . राजकिशोर मोदी ठरवतील तीच दिशा व त्याच दिशेने आम्ही वाटचाल करू अशी ग्वाही याप्रसंगी सर्वांच्या वतीने दिली.
माजी नगरसेवक बबन लोमटे यांनीदेखील याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले. राजकिशोर मोदी व आम्ही शरीराने जरी महायुतीत असलो तरीही मनाने एक विचाराचे असल्याचे यावेळी बोलून दाखवले. एकाच कुटुंबाचे मतदार संघात झालेले अतिक्रमण दूर करण्यासाठी या संवाद बैठकीत आपला विचार ठरवायचा असून तो सर्वांनी मिळून एकदिलाने ठरवूनार असल्याचे नमूद केले.ही निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी झाल्याचे बबन लोमटे यांनी सांगितले. सत्तेचा माज उतरवायचा असेल तर साठे सारख्या सामान्य माणसाला निवडणूक देण्याची साद यावेळी त्यांनी घातली.
आपल्या विस्तृत भाषणात राजकिशोर मोदी यांनी केज मतदारसंघात कुणाला मतदान करायचे याबाबत ही कार्यकर्ता बैठक आयोजित केली असल्याचे सांगितले. अंबाजोगाई शहर हे अठरा पगड जातीचे धर्मनिरपेक्ष असे शहर असल्याचे सांगितले. त्यांनी विद्यमान आमदार यांच्या नातेवाईकबद्दल बोलताना त्यांचा मतदार संघातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांच्यावर दहशत पसरवली असून ते सर्वजण दहशतिखाली काम करत असल्याचे नमूद केले. सामान्य मतदाराला वेढीस धरण्याचे काम ते करत असून माणूस बघून कोणतेही काम करत असल्याचे सांगितले. मग ज्यामध्ये डी पी असो, पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवने,असो किंवा दवाखान्यात रुग्णास दाखल करण्याचा प्रश्न असो त्यांचा फोन गेला तरच पुढील काम होते अन्यथा नाही अशी दहशत आमदाराचे नातेवाईक यांनी निर्माण केली असल्याने सामान्य माणूस यामध्ये भरडल्या जात असल्याचे राजकिशोर मोदी यांनी याप्रसंगी सांगितले. त्यांनी गेली कित्येक वर्ष एकच गुत्तेदार पोसण्याचे काम केले आहे. विद्यमान आमदार यांनी केलेला तथाकथित विकास हा विकास नसून ती एक सूज असल्याचे राजकिशोर मोदी यांनी नमूद केले. अंबाजोगाई नगर परिषदेवर १५० कोटींचा बोजा चढविण्याचे पातक आमदारांनी केले असून त्याची परफेड ही सामान्य माणूस भरत असलेल्या टॅक्स मधून केली जाणार असल्याचे सांगून अशा पातकी व घातकी आमदार व त्यांच्या नातेवाईकांना पुनः सत्तेपासून दूर ठेवण्याचे काम येणाऱ्या २० नोव्हेंबर रोजी साठे याना मतदान करून करण्याचे आवाहन राजकिशोर मोदी यानी उपस्थित जनसमुदायास केले. केवळ शहरातीलच नव्हे तर संपूर्ण केज मतदार संघातील त्यांचा दहशतवाद थांबवण्यासाठी एक सामान्य माणूस पृथ्वीराज साठे यांना भरघोस मतदानरुपी आशीर्वाद देऊन निवडून द्यावे असेही आवाहन राजकिशोर मोदी यांनी या कार्यकर्ता संवाद बैठकीत उपस्थित सर्व मतदार बांधवास केले.या बैठकीत अंबाजोगाई शहरातील विविध समविचारी पक्षाचे नेते, कार्यकर्ते व मतदार मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.