अंबाजोगाई

अंबाजोगाई शहरात दिव्यांग मतदार जनजागृती रॅली संपन्न…

अंबाजोगाई(प्रतिनिधी):- जिल्हा समाज कल्याण कार्यालय , SWAP तसेच दिव्यांग मतदार जनजागृती कक्ष अंबाजोगाई च्या वतीने सोमवार दि.११ रोजी शहरातून दिव्यांग मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते . या रॅलीस दिव्यांग मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद असा मिळाला.सदरील रॅली ही गटशिक्षण अधिकारी कार्यालयातुन निघून पुन्हा अंबाजोगाई शहर व परिसरात काढण्यात आली.या रॅलीस गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे
विस्तार अधिकारी सुवर्णकार सर, दिव्यांग मतदार कक्ष आंबाजोगाई तालुक्याचे नोडल अधिकारी आप्पासाहेब चव्हाण तसेच दिव्यांग कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी लांडे सर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखऊन उद्घाटन करण्यात आले.या रॅलीचे मार्गक्रमण गटशिक्षण अधीकारी कार्यालयापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक मार्गे तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आली. या रॅलीस दिव्यांग बांधव तसेच अंबाजोगाई शहरातील सर्व दिव्यांग शाळेतील मुख्याध्यापक , शिक्षक व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. दिव्यांगांचे १००% मतदान होण्याच्या दृष्टीने रॅलीमध्ये प्रबोधन होण्यासाठीचे फलक रॅलीमध्ये झळकत होते.

दिव्यांग मतदार जन जागृती रॅलीचा समारोप तहसील कार्यालय अंबाजोगाई येथे करण्यात आला. समारोप प्रसंगी तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, गटशिक्षण अधिकारी कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर सर्व दिव्यांग शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!