अंबाजोगाई

यंदा फक्त तुतारी…नो कमळ केज मतदार संघातील मतदारांचा दृढ निश्चय

अंबाजोगाई/केज(प्रतिनिधी):- कोणतीही निवडणूक म्हटले की घराणेशाही किंवा प्रस्थापित नेत्यांची मक्तेदारी असायची आणि बऱ्याच अंशी ती आजही आपणास अनुभवयास मिळते. मात्र अशाही परिस्थिती मध्ये केज मतदार संघातील एक संयमी, शांत व सर्वसामान्य उमेदवार म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने पृथ्वीराज शिवाजीराव साठे हे आपले नशीब आजमावत आहेत. त्यांना अशाच एका प्रस्थापित व मातब्बर अशा मुंदडा कुटुंबाशी सामना होत आहे. त्यामुळे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असाच हा सामना मतदारांना अनुभवयास मिळत आहे.
पृथ्वीराज साठे यांचा राजकिय प्रवास हा नगरसेवक पदापासून सुरु झाला आहे. त्यानंतर त्यांना नगराध्यक्ष पदाचा ही अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. विमलताई मुंदडा यांच्या आकस्मिक निधनानंतर पोट निवडणूकित पृथ्वीराज साठे यांना आमदार होण्याची संधी देखील प्राप्त झाली होती. त्या संधीचे सोने करत त्यांनी संपूर्ण मतदार संघात विकासकामे करून अल्पावधीतच नावलौकिक मिळवला होता . केलेल्या त्याच विकासकामांचे फलित म्हणून आज मतदार संघातील प्रत्येक गावागावात पृथ्वीराज साठे यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे.


दररोज मतदार संघातील दहा ते पंधरा गावांना व येथील नागरिक तथा मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत आहेत व आपल्यास पुन्हा एकदा मतदान रुपी आशिर्वाद देऊन सहकार्य करून राज्याच्या सदनात जाण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती मतदारांना करत आहेत. मतदार संघातील राहिलेली उर्वरित कामे जसेकी रेल्वे, एमआयडीसी, जिल्हा निर्मिती, आरोग्य, शिक्षण विषयक, तसेच बळीराजाचे विविध प्रश्नांची उकल करनार असल्याने आश्वासन साठे हे मतदारांना देत आहेत. मतदार देखील साठे यांच्या संपूर्ण ताकदीने पाठीशी खंबीरपणे उभे राहनार असल्याचे बोलतांना दिसून येत आहेत. यावरून यंदा संपूर्ण केज मतदार संघात फक्त तुतारीच .. नो कमळ असे चित्र पहावयास मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!