अंबाजोगाई

मुस्लिम व अल्पसंख्यांक समाजाच्या मदतीला धावून येणाऱ्या पृथ्वीराज साठे यांना विजयी करा – शेख जावेद शेख खलील यांचे आवाहन


अंबाजोगाई / प्रतिनिधी
मुस्लिम आरक्षण प्रश्नी पाठिंबा देणारे, हा विषय सातत्याने मांडणारे, तसेच आपल्या जाहीरनाम्यात मुस्लिम विद्यार्थी, विद्यार्थीनींसाठी वसतीगृह स्थापन करणार, नुरानी मस्जिद व परिसराची चांगल्या प्रकारे सुधारणा करणार, दरगाह हजरत शेख मसुद किरमाणी (रहे.) येथे सुशोभीकरण व मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणार तसेच केज व नेकनूर शहरात मुस्लिम समाजासाठी सुसज्ज आणि प्रशस्त शादीखाना बांधकाम करण्यास निधी उपलब्ध करून देणार असे जाहीर केले आहे. त्यामुळे मुस्लिम व अल्पसंख्यांक समाजाच्या मदतीला सदैव धावून येणाऱ्या पृथ्वीराज शिवाजी साठे यांना बुधवार, दिनांक २० नोव्हेंबर रोजी मतदान करून विजयी करा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते शेख जावेद शेख खलील यांनी केले आहे.

सामाजिक कार्यकर्ते शेख जावेद शेख खलील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, आपल्या जाहीरनाम्यात मुस्लिम समाजाच्या विविध बाबींचा समावेश करून मुस्लिम व अल्पसंख्यांक समाजाच्या मदतीला सदैव धावून येणारे एकमेव नेते म्हणून केज मतदारसंघातील मुस्लिम व अल्पसंख्यांक समाज आज पृथ्वीराज साठे साहेब यांच्याकडे पाहत आहे. साठे साहेब हे पाहिले नेते आहेत की, ज्यांनी आपल्या जाहीरनाम्यात मुस्लिम समाजाच्या विविध बाबींचा समावेश केला आहे. अंबाजोगाई शहरासह संपूर्ण केज मतदारसंघात मुस्लिम बहुल भागाचा, मोहल्ला यांचा विकास खऱ्या अर्थाने माजी आमदार साठे यांनीच केला. त्यांच्याच आमदारकीच्या काळात मुस्लिम समाजासाठी सुसज्ज आणि प्रशस्त शादीखाना बांधकाम करण्यास निधी उपलब्ध करून देण्यात आला. व तत्कालीन नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या कार्यकाळात भव्य असा शादीखाना उभा करण्यात आला. कोरोना काळात साठे साहेबांनी सर्वच जातीधर्माच्या लोकांना मदत मिळवून दिली. सहकार्य केले. मुस्लिम भागात साठे साहेब यांनी सातत्याने पाठपुरावा करून विकास कामे करण्याचे काम केले आहे. मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी आंदोलनात सहभागी होत, पाठपुरावा व प्रयत्न केले. त्यामुळे मुस्लिम समाज बांधव आज त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. ही एकजूट आता मतदानात देखील दिसणार आहे. असे मत शेख जावेद शेख खलील यांनी व्यक्त केले. केज विधानसभा मतदारसंघातील‌ सामाजिक एकता आणि जातीय सलोखा वाढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने राज्यात एकता आणि मुस्लिम समाजाच्या विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाचे उमेदवार या विधानसभा निवडणुकीत उभे करण्यात आले आहेत. हे महत्त्वाचे आहे. सामाजिक कल्याण कार्यक्रम आणि अल्पसंख्यांक मुस्लिम समुदाय विकास वाढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व महाविकास आघाडी काम करीत आहे. साठे साहेब यांच्या समाजकारणातील समर्पणामुळे त्यांना मुस्लिम समाजात व्यापक मान्यता मिळाली आहे आणि पवार साहेबांसोबतची त्यांची एकनिष्ठता त्यांच्या प्रयत्नांना चालना देण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल म्हणून पाहिले जाते. तसेच आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अल्पसंख्याक समाजाला सत्तेच्या मुख्य प्रवाहात मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होणार असल्याचे शेख जावेद शेख खलील यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात भाजप, शिवसेना (शिंदे गट) व महायुती कडून ‘बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है’ चा जयघोष केला जातो आहे, अशा घोषणांमुळे सामाजिक वातावरण दुषित होत आहे. जर महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर आले तर अल्पसंख्यांक मुस्लिम समाजावरील अन्याय, अत्याचार वाढण्याची शक्यता आहे. कारण, सध्याच्या महायुती सरकारने जाचक वक्फ विधेयक आणले आहे, आणि मुस्लिमांविरोधात वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार नितीश राणेंसारख्या नेत्यांवर कोणतीही कारवाई न करता अशा नेत्यांना पाठबळ दिले आहे. म्हणून राज्यासह केज विधानसभा मतदारसंघातील अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाला भविष्याची मोठी चिंता वाटत आहे. त्यामुळे अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाचे भविष्य सुरक्षित व्हावे, मुस्लिम समाजाची प्रगती व्हावी, शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून घेण्यासाठी अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाच्या मदतीला सदैव धावून येणाऱ्या माजी आमदार पृथ्वीराज शिवाजी साठे यांच्या अनुक्रमांक -३, तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून आपले मत देवून प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन शेख जावेद शेख खलील यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!