अजातशत्रू व्यक्तिमत्व व सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देणारे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना विजयी करा – डॉ.राजेश इंगोले
अंबाजोगाई / प्रतिनिधी
केज विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य जनतेचा चेहरा असलेले अजातशत्रू व्यक्तिमत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हास मतदानरूपी आशीर्वाद देऊन गरीब जनतेचे खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवारास प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन अंबाजोगाई नगरपरिषदेचे माजी शिक्षण सभापती तथा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे विश्वासू सहकारी सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
डॉ.राजेश इंगोले यांनी आवाहन केले आहे की, केज मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने विकास झालेला नाही. केवळ रस्ते गुळगुळीत झाला हे एकमेव परिमाण विरोधक विकासासाठी वारंवार मांडत आहेत. परंतु, अंबाजोगाई औद्योगिक क्षेत्र वसाहत अर्थात एमआयडीसी मध्ये मोठ-मोठे प्रकल्प, उद्योगधंदे आणून येथील बेरोजगार युवकांच्या हातांना काम देणे, बुट्टेनाथ साठवण तलाव, अंबाजोगाई पर्यटन विकास करणे, तीर्थक्षेत्र घोषित करणे, अंबाजोगाई जिल्हानिर्मिती, आशिया खंडातील सर्वांत मोठे हॉस्पिटल या नांवाने ओळखले जाणारे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील विविध विभागाच्या रिक्त जागा, कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा, अनेक मशीनरिंची अनुपलब्धता, विविध प्रकारच्या मशिनरी चालविण्यासाठी लागणारा तज्ञ कुशल तंत्रज्ञ वर्ग या विविध प्रलंबित समस्या मागील तीस वर्षांपासून एकाच कुटुंबाकडे सत्ता असताना ही का सुटल्या नाहीत..? असा परखड सवाल करीत केवळ गुत्तेदारी करणे आणि मर्जीतील गुत्तेदार पोसून या दोघांचाच विकास झाल्याचे सर्वसामान्य जनतेला दिसत आहे. विरोधक अर्थात भाजप ‘बटेंगे तो कंटेंगे’ असे जहाल विषारी नारे देऊन समाजात, राष्ट्रात फूट पाडणाऱ्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करत आहे , विरोधक या पक्षाचे उमेदवार असल्याने या नाऱ्याशी पाईक आहेत. भाजपचे सहा खासदार संविधान बदलण्याची गोष्ट करतात आणि मोदी, शहा व फडणवीस याचा साधा निषेध ही व्यक्त करत नाहीत याचा अर्थ त्यांचे संविधान बदलावे ह्या मागणीला मूक अनुमोदन आहे आणि केजचा भाजपचा उमेदवारही यांचेच प्रतिनिधित्व करतो. म्हणून भाजपचा उमेदवार निवडून देणे म्हणजे मनुवादी विचारसारणीचा एक आमदार विधानसभेत वाढविल्यासारखे आहे, जे या समाजाच्या राष्ट्राच्या अखंडतेकरिता धोकादायक आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष विचारसरणीची कास धरून, सामाजिक सलोखा कायम ठेवून संविधानाचे सरंक्षण करणारे, संवेदनशील असणारे, सर्वसामान्य माणसांच्या सुख – दुःखाशी नाळ जोडले गेलेले आणि सामाजिक भान असलेले नेतृत्व यावेळी विधानसभेत गेले पाहिजे, म्हणून सर्वसामान्य लोकांमध्ये सहजतेने मिसळून त्यांच्या प्रश्नांची जाण असणारे गोरगरिबांचे उमेदवार, महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार पृथ्वीराज साठे या अजातशत्रू व्यक्तिमत्वास येणाऱ्या वीस तारखेस ‘तुतारी’ फुंकणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून व पसंती देऊन प्रचंड बहुमतांनी निवडून द्यावे असे आवाहन डॉ.राजेश इंगोले यांनी केले आहे.
====================================