अंबाजोगाई

राजकिशोर मोदी यांनी राज्य विधानसभेसाठी आपल्या कुटुंबियांसह बजावला मतदानाचा हक्क

अंबाजोगाई(प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या केज विधानसभा मतदार संघासाठी अंबाजोगाई शहरात राजकिशोर मोदी यांनी आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला. सकाळी गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील मतदान केंद्रावर जाऊन अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी आपल्या मातोश्री कमलाबाई मोदी,त्यांच्या सुविज्ञ पत्नी सुनीता मोदी, बंधू भुषण मोदी,सरोज मोदी, मुलगा संकेत मोदी तसेच डिंपल मोदी यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. राजकिशोर मोदी यांनी मतदान केल्यानंतर अंबाजोगाई शहरातील सर्व मतदारांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा अधिकार वापरून योग्य उमेदवारास निवडणूक येण्यासाठी सहकार्य करावे असे अवाहन मोदी यांनी केले.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना एकसमान दिलेल्या मतदानाच्या अधिकार व हक्का नुसार तुमच्या एका मतदानाने महाराष्ट्राचे भविष्य ठरणार आहे. त्यामुळे उद्याच्या उज्वल महाराष्ट्रासाठी व येणाऱ्या उज्वल भावी पिढीसाठी आपण आपले अमूल्य असे मत आपापल्या भागात अतिशय शांतपणे व सामंजस्य पणे योग्य उमेदवार निवडून येण्यासाठी मतदान करावे असे मार्मिक आवाहन राजकिशोर मोदी यांनी अंबाजोगाई शहरातील सर्व युवा , महिला तसेच जेष्ठ नागरिकाना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!