डॉ.आदित्य पतकराव यांनी हिज एक्सलन्सी सुहैल महंमद यांना दिली योगेश्वरी मातेची प्रतिमा भेट.
अंबाजोगाई प्रतिनिधी:-
अंबाजोगाईच्या डॉ. आदित्य पतकराव यांनी दुबईतील रॉयल झरूनी पॅलेस येथे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर हिज एक्सलन्सी सुहैल मोहम्मद अल झरूनी यांना अंबाजोगाईच्या आराध्य ग्रामदेवी श्री योगेश्वरी मातेची प्रतिमा भेट दिली. या भेटीने अंबाजोगाईच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा जागतिक स्तरावर सन्मान झाला.
*लाखो भक्तांचे आहे श्रध्दास्थान !*
श्री योगेश्वरी देवी ही अंबाजोगाईची ग्रामदेवी असून महाराष्ट्रातील लाखो भक्तांसाठी श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहे. डॉ. आदित्य पतकराव यांनी ही भेट देऊन देवीच्या कृपेचा आणि अंबाजोगाईच्या सांस्कृतिक वारशाचा जागतिक पातळीवर गौरव केला तसेच अंबाजोगाईतील मंदिरांचा उल्लेख केला, अंबाजोगाईल लागलेली इतिहासिक परंपरा त्यांनी या वेळी सांगितली.
हिज एक्सलन्सी सुहैल अल झरूनी, जे त्यांच्या अनोख्या संग्रहासाठी आणि जागतिक संपर्कासाठी प्रसिद्ध आहेत, यांनी या भेटवस्तूचे विशेष कौतुक केले आणि अंबाजोगाई तसेच श्री योगेश्वरी देवीच्या आध्यात्मिकतेचे महत्व समजून घेतले, या भेटीदरम्यान सांस्कृतिक आदानप्रदान व भविष्यातील सहकार्याच्या नव्या संधी तयार होतील अशी अपेक्षा त्यांनी बोलताना केली.
माता योगेश्वरी चे सांगितले महत्व !
डॉ. पतकराव यांनी श्री योगेश्वरी देवीच्या अंबाजोगाईतील मंदिराच्या महत्त्वावर भर दिला. हे मंदिर फक्त श्रद्धास्थळच नाही तर अंबाजोगाईच्या समृद्ध इतिहासाचे प्रतीक आहे. त्यांनी अधिकाधिक लोकांनी येथे येऊन देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे ही ते म्हणाले या भेटीद्वारे अंबाजोगाईचा आध्यात्मिक वारसा आणि सांस्कृतिक परंपरा जागतिक स्तरावर पोहोचल्याचा अभिमान अंबाजोगाईकरांना वाटत आहे.