अंबाजोगाई येथे राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेला प्रारंभ बॅडमिंटन स्पर्धेसाठी राज्यभरातून खेळाडूंची उपस्थिती
अंबाजोगाई प्रतिनिधी:- श्री.अंबाजोगाई क्रीडासांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय खुल्या पुरुष एकेरी आणि पंधरा वर्षा खालील मुले एकेरी बॅडमिंटन स्पर्धेला गुरुवारी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.यास्पर्धेचे उद्घाटन मानवलोक सामाजिक संस्थेचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांनी दीप प्रज्वलन करून केले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे अध्यक्ष राजेश्वर चव्हाण होते.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस उपअधिक्षक अनिल चोरमले,तहसीलदार विलास तरंगे, मा उपनगराध्यक्ष बबन लोमटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण,शिवाजी सिरसाट, डॉ.राजेश इंगोले,प्रा.शिवदास सिरसाट, क्रीडाशिक्षक शिवकुमार निर्मळे, पत्रकार अविनाश मुडेगावकर यांची उपस्थिती होती.
यावेळी तहसीलदार विलास तरंगे,डॉ.राजेश इंगोले, अनिल चोरमले,अनिकेत लोहिया, राजेश्वर चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले, त्यानंतर बॅडमिंटन मैदानावर मान्यवरांनी श्रीफळ वाढऊन आणि बॅडमिंटन खेळून स्पर्धेला सुरुवात केली.सुरुवातीला प्रा . प्रविण दिग्रसकर यांनी प्रास्ताविक केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत आरसुडे यांने केले तर समारोपप्रसंगी संयोजक प्रविण देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले. या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी दीडशे स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.स्पर्धेचे पंच म्हणून कैलास शेटे,चेतन पाडे व इतरांनी काम पाहिले,स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी रणजीत लोमटे,प्रविण देशमुख,श्रीनिवास मोरे,राहुल देशमुख, नितीन कातळे,अनंत मसने,महेश लोमटे,किरण सेलमुकर,शरद लोमटे,ज्ञानेश्वर गित्ते, तुषार जोशी,संतोष कदम,राहुल राख,वसंत कांबळे, दत्ता सावंत,श्रीपाद देशमाने व इतरांनी काम पाहिले या स्पर्धेसाठी राज्यभरातून खेळाडूंनी उपस्थिती लावली आहे.