*कागदी कपावर बंदी आणण्याची पत्रकार आरेफ सिद्दिकी यांची मागणी* .
अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
कागदी कप वापरण्यासाठी सर्व व्यावसायिकांवर बंदी आणावी अशी मागणी पत्रकार आरेफ अहेमद यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात आरेफ अहेमद यांनी पुढे असे म्हटले आहे की, वरील विषयी विनंतीपुर्वक अर्ज करण्यात येतो की, चहासाठी वापरले जाणारे कागदी कप हे आरोग्यासाठी हाणिकारक असून त्यात विविध केमिकल मिसळलेले असतात. त्यामुळे आरोग्यावर अतिशय घातक परिणाम होवू शकतात. कपामध्ये गरम चहा किंवा इतर द्रव्य ओतल्यानंतर त्यातील केमिकल हे चहामध्ये किंवा द्रव्यामध्ये मिसळतात व ते शरीरामध्ये जातात त्यामुळे कॅन्सर सारखे आजार बळावू शकतात.
तरी मे. साहेबांनी सदरील प्रकरणाची गंभीर दखल घेवून कागदी कप बंदी आदेश पारीत करुन सर्वांना उपकृत करावे अशी मागणी केली आहे. या निवेदनावर आरेफ अहेमद यांची स्वाक्षरी आहे.