बीड(प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाशी संलग्न असलेल्या
शासकीय धान्य गोदाम हमाल पंचायत मधील हमाल मापाडी बांधवाचे मानधन रक्त ओखुन, घामगाळूनही एकदम तुटपुंजे येते त्यावर कुटुंबाचा गाडा कसाबसा ओढला जातो.त्यातही आँगष्ट महिण्यापासून आजतागायत थकबाकी असल्याने कुटंबावर उपासमारीची वेळ आली आहे.लवकरात लवकर मानधन मिळावे या मागणीसह ईतर मागण्यांसाठी हमाल मापाडी बांधवांनी ठिकठिकाणच्या गोदामावर 10 जानेवारी पासून
लाक्षणिक काम बंद आंदोलन
सुरू केले आहे.
मा. जिल्हाधिकारी, जि.बीड, जिल्हापुरवठा अधिकारी, जि.बीड,
मा. अध्यक्ष/सचीव बीड जिल्हा माथाडी व असंरक्षीत कामगार मंडळ, जि. बीड द्वारा-सरकारी कामगार अधिकारी
यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
१. ऑगस्ट, सप्टें, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर २०२४ ची नियमित कामाची हमाली तात्काळ मिळावी. यामध्ये गेवराई तहसीलदार यांचे कडून बिले दाखल करण्यास दिरंगाई होत असल्याची आमची माहिती आहे. या बाबत प्रशासकिय कारवाई व्हावी.
२. माथाडी नियामानूसार दरमहा वेतन जमा न करणाऱ्याकडून १०% दंडाची वसूल करण्यात यावी.
३. बीड शहर गोदामातील हमालांना बेकायदेशीर रित्या कामावरुन कमी केल्याने त्यांना तात्काळ कामावर घेण्या यावे व माथाडी मंडळाने नियूक्त न केलेल्या कामगाराकडून काम करुन घेतल्याने संबंधीत नियूक्त कामगारांचे अर्थिक गळचेपी होत असल्याने त्यांना त्वरीत कामावर घेण्याच्या सूचना द्याव्यात अशी विनंती असे न झाल्यास माथाडी कायद्यातील तरतूदीनूसार कार्यवाही व्हावी.
४. मा. उच्च न्यायालयाने १ ऑगष्ट २०२३ रोजी माहे मार्च २०१२ पासूनचा महागाई निर्देशांकाचा फरक देण्याबाबत आदेश दिला मात्र पुरवठा विभागास वेळोवेळी अवगत करुनही फरक मिळाला नाही तात्काळ फरक देण्यात यावा.
५. थेट वाहतूक टप्पा १ व टप्पा २ साठी गोदामातील नियूक्त हमालांचा रोजगार कमी होत असल्याने संबंधीत कंत्राटदाराने ज्या त्या गोदामातील नोंदीत हमालांकडूनच काम करुन घ्यावे.
ईत्यादी मागण्यांसाठी
राजकुमार घायाळ
(अध्यक्ष) शासकिय धान्य गोदाम हमाल पंचायत (उपाध्यक्ष म.रा.हमाल मापाडी महामंडळ),रावसाहेब गाडे,संजय लोखंडे
,राम कुकर ,सरचिटणीसःवसंत चव्हाण
सहचिटणीस :वैजनाथ शिंदे,
युवराज खाडे,अतुल गायकवाड,खजिनदारःअशोक गायकवाड,कार्यकर्ता सदस्यःकल्याण शेंडगे,लाला दोनगव्ह,बाळु जामकर,हनुमंत वैद्य,गणेश आढाव,वैजनाथ किरवले,बाबासाहेब मुंढे,विकास शिंदे,जालींदर राऊत,श्रीरंग वाघ,बप्पासाहेब जाधव,शेख मुजक्कीर,विजयकुमार राऊत,शेख इस्माईल,महावीर ढोकणे,सल्लागारःदत्ता धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई येथील शासकीय धान्य गोदामातील
लालासाहब होनगहू,ज्ञानोबा धबडगे
,मल्हारी वाघमारे,अय्युब गवळी
आसेफ लंगे, सचिन वाघमारे
अनिल पवळे,मुस्तफा रेगीवाल,अहेमद चौधरी, रनु तुंडिवाले, नित्यानंद वारकरीसह
हमाल बांधव विविध मागण्यांसाठी लाक्षणिक कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत.
लवकरात लवकर मानधन देवून कुटुंबाची उपासमार थांबवावी अशी विनंती करत आहेत.