*अंबाजोगाई आगाराचा गलथान कारभार सुधारता सुधारेना, काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती दरीत कोसळणारी बस कठड्याने रोखली*
*आगार प्रमुखा सह येथील अधिकारी कामगार व प्रवाशांच्या जीवाशी किती दिवस खेळणार?*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
उत्पन्नाच्या बाबती मध्ये अव्वल क्रमांक पटकावलेल्या अंबाजोगाई अगाराच्या नादुरुस्त बसेस लाईन वर पाठवल्या जात असल्याने त्या रस्त्या मध्ये कुठेही नादुरुस्त होण्याचे प्रमाण काही नाव घ्यायला तयार नसून मांडवा मार्गे जानाऱ्या बस चे ब्रेक निकामी झाल्याने बस घाटा मध्ये कोसळणार तेवढ्यात एका दगडी कठड्यावर चढली आणि मागील टायर वर थांबल्याची घटना आज सकाळी घडली. दरम्यान आगार प्रमुखाचा कारभार “आंधळ दळत कुत्र पिठ खात” असा झाला असून या प्रकारातून आगार प्रमुखा सह येथील अधिकारी कामगार व प्रवाशांच्या जीवाशी खेळतायत का असा प्रश्न वारंवार उपस्थित होतो आहे.अंबाजोगाई आगार हा बीड जिल्ह्यात सर्वाधिक उत्पन्न देणारा आगार, जिल्ह्यात सर्वाधिक बसेस अंबाजोगाई बस स्थानका मधून धावतात. काही महिन्या पूर्वीच अंबाजोगाई आगाराने उत्पन्नाच्या बाबती मध्ये विभागात अव्वल क्रमांक पटकावला होता मात्र असे असतानााही अंबाजोगाई आगारातून बाहेर पाठवल्या जाणाऱ्या 100 पैकी 70 ते 80 बसेस या नादुरुस्त अवस्थेत असतात आगारातील मेकॅनिक विभागातील कामगार अशा नादुरुस्त बसेस थातूर मातूर कामे करून लाईन वर पाठवतात. अनेक बसेसचे एक्सलचे नट गेलेले आहेत, हे नट सुद्धा टाकल्या जात नाहीत. अनेक गाड्याच्या काचा फुटलेल्या आहेत, अनेक गाड्याचे पत्रे केवळ लोंबत नाहीत तर गाडी मध्ये बसताना दरवाजाचे पत्रे देखील निघालेले आहेत जे की प्रवाशांना गाडीत बसताना जीव घेणे ठरू शकतात. यातच आता ब्रेक निकामी होण्याचे प्रमाण ही वाढताना दिसून येत आहे.
चालक वाहकांची ईच्छा नसतानाही लाईनवर पाठवल्या जात असलेल्या गाड्या मध्ये ना जॅक स्टूल किट असते ना स्पेअर टायर असतात. लाईन वरील बहुसंख्य गाड्याना 10.20 च्या टायर ला 9.20 चे ट्यूब लावून गाड्या बाहेर पाठवल्या जातात. त्या मुळे पंक्चर चे प्रमाण मोठ्या प्रमानावर वाढले आहे.
एकूणच मेकॅनिक विभागाचे प्रमुख (ए डब्लू एस) धस यांचा मेकॅनिकल विभागातील कामगारांवर वचक नाही त्यामुळे त्यांचे कामावर लक्ष नाही. सर्व यंत्रणेवर लक्ष ठेवण्याची ज्यांची जबाबदारी आहे असे आगार प्रमुख राऊत यांचा यंत्रणेवर काडी मात्रही वचक राहिला नसल्याने लाईन वर पाठवल्या जात असलेल्या बसेस रस्त्या मध्ये कुठेही बंद पडतात, आशा नादुरुस्त बसेसमुळे कोणत्या वेळी कोणत्या बसेसचा अपघात होईल आणि कोणाचा बळी जाईल याचा काडी मात्र भरोसा राहिला नसून आगार प्रमुखाचा कारभार म्हणजे “आंधळ दळत कुत्र पिठ खात” असा झाला आहे.
*काळ आला होत पण वेळ आली नव्हती*
आज सकाळी 6.35 वाजता मांडवा मार्गे वाघाळा जाणारी एम एच 14 बी टी 1719 क्रमांकाची बस मांडवा घाटात जाताच चालक पाराजी उबाळे यांच्या लक्षात आले की बसचे ब्रेक फेल झाले आहे, त्यामुळे वळणावर असलेली बस कंट्रोल करण्याचा अतोनात प्रयत्न केला खरा मात्र चालक उबाळे वाहक सुरेश जाधव यांच्या सह सर्व प्रवाशांचे नशीब बलवत्तर असल्याने त्यांच्या साठी काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती त्यामुळे बस दरीच्या कठड्यावर चढून मागील टायरला अडकून जागेवर थांबली. यावेळी चालक वाहका सह बस मधून प्रवास करणाऱ्या 11 च्या जवळपास प्रवाशांनी जीव वाचला म्हणून सुटकेचा श्वास सोडला खरा मात्र यातील काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.
दरम्यान या बसचे ब्रेक निकामी असल्या संदर्भात बसच्या चालकाने कालच आपल्या लॉक सीट वर लिहून दिले होते. मात्र मेकानिकल विभागाने थातूर मातूर काम करून आज हीच बस पुन्हा लाईनवर पाठवली व पूढील दुर्घटना घडली. दोन दिवसा पूर्वीही हाच प्रसंग
प्राप्त माहिती नुसार दोन दिवसा पूर्वी याच रस्त्यावर मांडे खेल जाणाऱ्या 0805 क्रमांकाच्या बसचे ब्रेक निकामी झाले मात्र चालक मुंडे यांना प्रसंगावधान राखून बस सफाई च्या राणावर नेऊन थांबवण्यात यश आले व या वेळी ही मोठा अनर्थ टळला. दरम्यान वारंवार होणाऱ्या या दुर्घटना पाहता आगार प्रमुखा सह येथील अधिकारी व कामगार प्रवाशांच्या जीवाशी किती दिवस खेळणार असा प्रश्न उपस्थित होतो आहे हे मात्र निश्चित.