माणसाने आपल्या आयुष्यात शिष्टाचार जरूर पाळावेत पण शिष्ट कधीच असू नये.. ऍड कल्याणी विर्धे यांचे आंतरभारतीच्या मेरी बात मध्ये मनोगत
अंबाजोगाई प्रतिनिधी :-
आंतरभारती शाखा अंबाजोगाई तर्फे दिनांक 11/01/2025 रोजी मेरी बात या उपक्रमाचा 11 वा भाग संपन्न झाला. या कार्यक्रमात कायदेतज्ञ, सामजिक कार्यकर्त्या, आंतरभारती शाखा अंबाजोगाई च्या कार्यकारणी सदस्य, योगेश्वरी शिक्षण संस्था च्या संचालिका ऍड. कल्याणी विर्धे यांनी आपला प्रेरणादायी जीवन प्रवास व्यक्त केला.
आपला जीवनातील प्रवासाचे वर्णन करताना ऍड. विर्धे म्हणल्या की, शालेय जीवनापासून तत्त्वाशी तडजोड करणे जमलेच नाही, एनसीसी मुळे आयुष्याला शिस्त मिळाली, वाचनाची आवड व विचार करण्याची प्रेरणा यामधून समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी आपण काहीतरी करू शकतो ही भावना निर्माण झाली. आयुष्याकडे सकारात्मक पाहण्याचा दृष्टिकोन निर्माण झाला. आयुष्यात संघर्ष मेहनत घ्यावीच लागते पण त्याची फळे चांगलीच येतात. वकील व्यवसायातील माझे गुरु माझे पती ऍड. जयदीप विर्धे यांच्या प्रोत्साहनातून वकिली व्यवसायात उत्तुंग कार्य करू शकले. वकिली व्यसायात अंबाजोगाई संघाच्या सहसचिव, सचिव, मनस्विनी महिला प्रकल्पाच्या कायदेविषयक सल्लागार म्हणून कार्य करू शकले.
आपल्या मनोगतचा समरोप करताना ऍड. विर्धे म्हणल्या की, माणसाने आपल्या आयुष्यात शिष्टाचार जरूर पाळावेत पण शिष्ट कधीच असू नये. कुटुंबातला संवाद दुरावला जाऊ नये कुटुंब संस्था टिकवणे हे आपल्याच हातात आहे. माणूस म्हणून आपण स्वतःचा सन्मान तर करावाच पण इतरांचाही सन्मान केलाच पाहिजे. असे मनोगत ऍड. कल्याणी विर्धे यांनी आंतरभारतीच्या मेरी बात या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
हा कार्यक्रम अंबाजोगाई येथील मंगळवार पेठेतील मानलोकच्या जनसहयोग कार्यालयात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महावीर भगरे यांनी ऍड. कल्याणी विर्धे यांचे पुस्तक देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन व्यंकटेश जोशी यांनी केले. या कार्यक्रमासाठी आंतरभारतीच्या अध्यक्ष डॉ.प्रा. शैलजा बुरुरे, सचिव श्री. संतोष मोहिते कोषाध्यक्ष महावीर भगरे, ऍड. जयदीप विर्धे, दत्ता वालेकर, विनायक गडेकर, शरद लंगे, व्यंकटेश जोशी, राजेंद्र कुलकर्णी, किरण असरडोकर, वर्षा देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.