अंबाजोगाई आगारातील ३०० कर्मचाऱ्यांची मधुमेह व नेत्र तपासणी रोटरी क्लब व स्व.सुनीलकाका लोमटे प्रतिष्ठानचा उपक्रम
अंबाजोगाई प्रतिनिधी -: येथील रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी व स्व.सुनीलकाका लोमटे प्रतिष्ठान यांच्या वतीने सोमवारी अंबाजोगाई आगारातील कर्मचारी यांच्यासाठी मोफत मधुमेह तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ३०० कर्मचाऱ्यांची तपासणी झाली.
या शिबिराचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शंकर धपाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी
स्व.सुनीलकाका लोमटे प्रतिष्ठानच्या श्रीमती शोभाताई लोमटे, रोटरी क्लबचे अध्यक्ष कल्याण काळे, सचिव धनराज सोळंकी, प्रकल्प संचालक,डॉ.अतुल शिंदे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ बालासाहेब लोमटे,प्रा. संतोष मोहिते, संयोजक कृष्णा लोमटे, नेत्रतज्ञ डॉ. प्रज्वल देशपांडे,रोटरीचे उपाध्यक्ष अजित देशमुख, आनंद कर्णावट,डॉ. निशिकांत पाचेगावकर, प्रदीप झरकर,स्वप्नील परदेशी, भिमसेन लोमटे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ धपाटे म्हणले की स्व. सुनीलकाका लोमटे यांच्या जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून लोमटे परिवाराने नवा आदर्श निर्माण केला आहे. शहर व परिसरात विविध आरोग्य विषयक उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक ती मदत करू. असे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना शोभाताई लोमटे म्हणाल्या की सुनीलकाका यांनी उपेक्षितांना न्याय देण्यासाठी काम केले. त्यांच्या कार्याचा वारसा पुढेही अखंडित सुरूच राहील. असे त्या म्हणाल्या. या वेळी महुमेह तज्ज्ञ डॉ अतुल शिंदे व त्यांच्या टीमने कर्मचाऱ्यांची रक्तदाब व मधुमेह तपासणी केली.तर नेत्रतज्ञ डॉ. प्रज्वल देशपांडे यांनी कर्मचाऱ्यांची नेत्र तपासणी केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्याण काळे यांनी केले.संचलन प्रा. संतोष मोहिते यांनी तर उपस्थितांचे आभार धनराज सोळंकी यांनी मानले.