अंबाजोगाई

*शिक्षक मैत्री प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित सामान्य ज्ञान परीक्षेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सलग तिसऱ्या वर्षी ८०० विद्यार्थ्यांनी दिली एम पी एस सी च्या धर्तीवर सामान्य ज्ञान परीक्षा*

अंबाजोगाई(प्रतिनिधी):- ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी शिक्षक मैत्री प्रतिष्ठाणच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेस विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. या परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. जवळपास ८०० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्वामी विवेकानंद , राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ही सामान्य ज्ञान परीक्षा शिक्षक मैत्री प्रतिष्ठाण अंबाजोगाईच्या वतीने संकल्प विद्या मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती. प्रतिष्ठाण च्या वतीने आयोजित सामान्य ज्ञान परीक्षेचे हे तिसरे वर्ष होते.

ही स्पर्धा आयोजीत करण्यामागची संकल्पना शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार यांनी मांडली. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये लेखन व वाचनाची आवड व गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने ही परीक्षा घेण्यात आल्याचे रापतवार यांनी नमूद केले. सदरील परीक्षा ही ५० गुणांची ५० वस्तुनिष्ठ प्रश्नांसाह प्रत्येकी एक गुण अशा स्वरूपाची होती. प्रत्येक वर्षी मुलांची संख्या वाढत असल्याने या स्पर्धेस मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे यावरून दिसून येत आहे.

या स्पर्धा परीक्षेसाठी प्रमुख पाहुणे श्री योगेश्वरी दर्शन न्युज चॅनल चे संपादक नागेश औताडे जि प प्रा शा डोंगर पिंपळाचे मुख्याध्यापक श्री कोरटवाड सर, पिंपळा धायगुडा शाळेचे मुख्याध्यापक श्री संजीव उमाप हे उपस्थित होते. त्यांनी देखील उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. प्रत्येक विद्यार्थी हे एकमेकांत स्पर्धा निर्माण करतात व त्यातून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे औताडे यांनी याप्रसंगी स्पष्ट केले. उपस्थित सहभागी विद्यार्थ्यांना ज्या शिक्षक मैत्री प्रतिष्ठानने ही सामान्य ज्ञान परीक्षा आयोजित केली आहे त्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष कोण आहेत या प्रश्नापासूनच या स्पर्धेची सुरुवात केली व या प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावरून आजची पिढी ही किती सजग व जागृत आहे याचा अनुभव करून दिला.

या स्पर्धेसाठी गट शिक्षण अधिकारी कार्यालयातील जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मधुकर सुवर्णकार यांनी देखील विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत प्रतिष्ठाण राबवित असलेल्या या विधायक उपक्रमाचे देखील कौतुक केले. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप संकल्प विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका श्रीमती रेखा बडे यांनी केला. शिक्षक मैत्री प्रतिष्ठान हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगाची ओळख करवून देत आहे. त्याचबरोबर त्यांना स्पर्धेत उतरण्यासाठी त्याचबरोबर स्पर्धेत टिकण्यासाठीची जिद्द निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याबद्दल प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार तसेच त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. मागील दोन वर्षांपासून संकल्प विद्या मंदिर येथे शिक्षक मैत्री प्रतिष्ठान हे सामान्य ज्ञान ही परीक्षा आयोजित करत आहे. या विद्यालयाकडून स्पर्धेसाठी सर्वोतोपरी सहकार्य केल्या जात आहे व यापुढेही ते सहकार्य असेच केले जाईल अशी ग्वाही श्रीमती रेखा बडे यांनी याप्रसंगी दिली.

सदरील सामान्य ज्ञान परीक्षा ही ५ वी ७ वी आणि ८वी ते १० वी या दोन गटात संपन्न झाली . या परीक्षेसाठी अंबाजोगाई शहरासह चिंचखंडी, ममदापूर, कुंबेफळ , मुडेगाव व भावठाणा या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसह खाजगी स्थानिक शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थी देखील या सामान्य ज्ञान परीक्षेत सहभागी झाले होते. या परीक्षेसाठी संकल्प विद्या मंदिर या संस्थेचे संस्थापक कैलास चोले तसेच मुख्याध्यापिका श्रीमती बडे रेखा यांच्यासह त्यांच्या संस्थेतील विश्वनाथ गायकवाड , नितीन शिंदे , यांनी मोलाचे सहकार्य केले. दोन्ही गटामधून परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास १५०१/ रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र त्याचबरोबर द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यास १००१/ रुपये रोख सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, त्याचबरोबर उत्तेजनार्थ येणाऱ्या विद्यार्थ्यास ७०१/ रुपये, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सामान्य ज्ञान परीक्षा संपन्न करण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार , उपाध्यक्ष पांडुरंग नरवडे, सचिव विष्णू सरवदे ,सहसचिव शेख इरफान , कोषाध्यक्ष साधू गायकवाड ,सल्लागार दत्ता देवकते, माजी नगरसेवक सुनील व्यवहारे,उमेश नाईक, सदस्य अनुरथ बांडे , बाळासाहेब माने , सुनील पवार , शेख आरिफ, महेश वेदपाठक, संदीप दरवेशवार, समाधान धिवार, अशोक पोपळघट, गणेश तौर, बालाजी टिळे, महेश पवार, मोरोपंत कुलकर्णी , आत्माराम बनसोडे ,जगन्नाथ वरपे, रत्नाकर निकम श्रीनिवास मोरे,विष्णू मुसळे,आशरब पठाण,जगन्नाथ वरपे, आदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!