*विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच मैदानी खेळाकडे लक्ष द्यावे.* पोलीस निरीक्षक श्री घोळवे साहेब गुरुदेव विद्यालयांमध्ये शालेय क्रीडा स्पर्धेत प्रारंभ*
अंबाजोगाई प्रतिनिधी:-
बनेश्वर शिक्षण संस्था संचलित गुरुदेव विद्यालय मोरेवाडी येथे शालेय क्रीडा स्पर्धेत प्रारंभ झाला असून अत्यंत उत्साहामध्ये या क्रीडा स्पर्धा संपन्न होत आहे. क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री घोळवे साहेब यांची उद्घाटक म्हणून उपस्थिती होती. तसेच प्रमुख अतिथी म्हणून मोरेवाडी ग्रामपंचायतचे सदस्य रणजीत मोरे, राजेवाडी चे सरपंच विलास काचगुंडे, पोलीस कर्मचारी भागवत कदम, अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे संतोष बदने यांची उपस्थिती होती. भव्य मैदानावर गुरुदेव विद्यालयातील शालेय क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व कबड्डी संघाच्या कर्णधारांचा टॉस करून करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक घोळवे साहेब म्हणाले की, अंबाजोगाई शहराला खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे. या शहराने अनेक क्षेत्रांमध्ये मूल्यवान हिरे दिलेले आहेत. मोबाईलचा युगामध्ये लाल मातीतील खेळ लुप्त होत चाललेले आहे. आज खूप वर्षांनी मी या ठिकाणी लाल मातीचे मैदान आणि विद्यार्थ्यांचा उत्साह अनुभवत आहे त्यामुळे मनाला समाधान वाटते.
विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच मैदानी खेळालाही महत्व दिले तर शारीरिक क्षमता आणि त्यासोबतच बौद्धिक क्षमताही वाढण्यास मदत होईल. याप्रसंगी सर्व मान्यवरांचा गुरुदेव परिवाराच्यावतीने सत्कार करण्यात आला. शालेय क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब शिंदे, श्री प्रकाश बोरगावकर, सूर्यकांत तेलंग, नामदेव शेरे, पंडित चव्हाण, विजय भिसे, सौ शितल काळदाते सौ ज्योती काळे , सौ सोनाली कोनाळे, सौ संगीता मोरे, गोपीनाथ बर्डे, सुग्रीव पवार, सुभाष खेडकर यांनी परिश्रम घेतले.