अंबाजोगाई करांना बसस्थानकाच्या धुळीपासून मुक्ती मिळणार….
–
अंबाजोगाई प्रतिनिधी:-
उद्या 25 जानेवारीपासून बसस्थानकात सिमेंट रस्त्याचे काम सुरू होणार असून तसे फलक लावण्यात आले आहे.काम पुर्ण होईपर्यंत बसस्थानक हे तात्पुरत्या स्वरूपात शंकर महाराज वंजारी वस्तीगृह (बागेच्या समोर) येथे स्थलांतरित करण्यात येत आहे.
थोडक्यात माहिती अशी की,राज्यातून स्वच्छतेबाबत 10 लाख रुपयाचे पारितोषिक पटकावणाऱ्या अंबाजोगाई बसस्थानकाची आता कुठे स्वच्छता होणार आहे.बसस्थानकाची नविन वास्तू करण्यात आली मात्र, अंतर्गत रस्ते तसेच ठेवण्यात आले होते.त्यामुळेच रस्त्यावर जागोजागी खड्डे पडून फुफाट्यातून प्रवास करण्याची वेळ प्रवासीवर्गावर आली होती.प्लाॅटफार्मवर बस ची वाट पाहत बसलेल्या प्रवाशांना धुळीचा मोठा सामना करावा लागत होता.या संबंधात वर्तमान पत्रात बातम्याही छापून आल्या.यामुळे अंबाजोगाई बसस्थानकाची सर्वञ चर्चा होवू लागली. गेल्याच वर्षी अंत्यत घाईगडबीत तत्कालीन मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अंबाजोगाई बसस्थानकाचे ऑनलाईन उदघाटन करण्यात आहे.त्यामुळेच अंबाजोगाईचे बसस्थानक आणखीनच चर्चेत राहिले.आता उद्या 25 जानेवारीपासून सदरील बसस्थानकात सिमेंट क्रांकीटचे काम होणार असल्याचे फलक आज लावण्यात आले.काम पूर्ण होईपर्यंत बसस्थानक शंकर महाराज वंजारी वस्तीगृह (योगेश्वरी उद्यान समोर) येथे स्थलांतरित करण्यात आले असून याची सर्व प्रवासी वर्गानी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.