*कंञाट कामगारांचा प्रीपेड स्मार्ट मिटरच्या विरोधात 01 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन*
अंबाजोगाई प्रतिनिधी -संपूर्ण महाराष्ट्रात स्मार्ट विद्युत मीटर बसवण्याचे काम सूरु झाले असून, यामुळे घरोघरी जावून रिडींग घेवून वीज बील वाटणाऱ्या कंञाट कामगारांवर बेरोजगारांची कुऱ्हाड कोसळणार असून या निर्णयाच्या विरोधात 01 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
एम.एस.ई.डी.सी.एल.मीटर रिडींग कंञाटी कामगार संघटनेच्या वतीने अंबाजोगाई येथील पदाधिकाऱ्यांनी
उपजिल्हाधिकारी,वीज उपविभागीय कार्यालय,खा.बजरंग सोनवणे, माजी.आ.पृथ्वीराज साठे यांना निवेदन दिले.या निवेदनात असे म्हटले आहे की,शासन व महावितरणास वेळोवेळी उपोषण व आंदोलन च्या माध्यमातून मागणी केली आहे की, स्मार्ट विद्युत मीटर लागल्यावरही वयाच्या 60 वर्ष पर्यंत रोजगाराची शाश्वती द्यावी.नुकत्याच नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात उर्जा सचिव यांना निवेदनही दिले.परंतु 1 महिना झाला तरी,कामगार संघटनेस चर्चेला बोलावले नाही.त्यामुळे आम्हाला काम बंद आंदोलन केल्याशिवाय कुठलाही पर्याय राहिला नसून महावितरण कंपनीने सरकारकडे कामगारांच्या रोजगार निश्चितीची शाश्वती द्यावी,अन्यथा एक फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. काम बंद आंदोलनामुळे महावितरणचे आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी कामगारांची राहणार नाही,असे म्हटले आहे.
या निवेदनात कालीदास रामरूले,रेहानेद्दीन शेख,संतोष बिचकुले,चेतन रामरूले ,प्रमोद शिंदे,ऋषी क्षीरसागर, राहुल निसरगंध, बनेश्वर रूपनर, विलास सुरवसे,माणिक घोडके,विठ्ठल गायकवाड, अशोक अंबड,दत्तात्रय शिराळकर, फुके, क्षीरसागर, विकास क्षीरसागर, शिवाजी थोरात, नितीन सोनवणे, प्रविण लोखंडे, अंबिर कुरेशी,पंकज टाकणकर, सुनिल होके,देविदास खैरमोडे,राम हजारे,भीमाशंकर स्वामी,बप्पा बलाडे,गंगाधर टापरे, अशोक भालेराव, तानाजी मिसाळ, राहुल शेटे, श्रीराम मुळे, मुहाफिज पठाण, शुभम मस्के,रविराज भालेराव, गौतम भालेराव, विश्वास पकाने आदींचे नावे आहेत.