*योगेश्वरी पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांचे हिवाळी परीक्षेत घवघवीत यश* *स्वयंचलित अभियांत्रिकी विषयात परमेश्वर दळवे राज्यात प्रथम*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अभियांत्रिकी पदविका हिवाळी सत्र परीक्षा-२०२४ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून येथील यो शि संस्था संचलित कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
तृतीय वर्षाच्या स्वयंचलित अभियांत्रिकीच्या परमेश्वर दळवे याने (९२.३२%) इतके गुण घेऊन राज्यात प्रथम येण्याचा सन्मान मिळविला आहे.
प्रथम वर्ष संगणक अभियांत्रिकी पदविका वर्गातून स्वामी शिवांजली (९३.१८%), प्रथम,माळी अदिती (९०.७१%) द्वितीय, मिश्रा आर्या (९०.२४%) तृतीय. द्वितीय वर्ष संगणक अभियांत्रिकी पदविका वर्गातून सूर्यवंशी श्रुतिका (९३.५३%) प्रथम, तिडके विशाखा (९२.९४%) द्वितीय, तिवारी प्रबल (९२.५६%) तृतीय. तृतीय वर्ष संगणक अभियांत्रिकी विभागातून लांडगे अनिश्का (९१.५६%) प्रथम, देशमुख स्नेहा (९०.७८%) द्वितीय, देशमाने सायली (९०.२२%) तृतीय.
प्रथम वर्ष स्थापत्य अभियांत्रिकी पदविका वर्गातून जोशी वेदांत (९२.३५%) प्रथम, बडे सौदागर (९१.७७%) द्वितीय,साळुंके पायाल (८९.२९%), तृतीय, द्वितीय वर्ष स्थापत्य अभियांत्रिकी पदविका वर्गातून सस्ते तेजस्विनी (८६%)प्रथम,मुळे हर्ष (८१.५३%) द्वितीय, मुळे अंकिता (८०.७१%) तृतीय तृतीय वर्ष स्थापत्य अभियांत्रिकी वर्गातून भांगे ज्ञानेश्वर (९४%) प्रथम, दराडे दीप्ती (९०%) द्वितीय, मुंडे नागनाथ (८८.२०%) तृतीय
प्रथम वर्ष यंत्र अभियांत्रिकी वर्गातून होळकर स्वाती (९०.८२%) प्रथम, कुलकर्णी सोनाली (८८.७१%) द्वितीय, वाकडकर शुभांगी (८७.७७%)तृतीय, द्वितीय वर्ष यंत्र अभियांत्रिकी पदविका वर्गातून, हारे अश्विनी (८५%) प्रथम, राऊत रोहिणी (७९.५६%) द्वितीय, चौघुले निलेश (७६.५६%) तृतीय, तृतीय वर्ष यंत्र अभियांत्रिकी वर्गातून पवार निकिता (८८.३८%) प्रथम, कत्राळे शुभांगी (८८.१०%) द्वितीय, हाके अहिल्या (८७.३३%) तृतीय.
प्रथम वर्ष स्वयंचलित अभियांत्रिकी वर्गातून चि. थोरात वरुण (८३.१८%) कु.वायसे प्राची (८३.१८) प्रथम, वायसे सानिका (८२.८२%) द्वितीय व कुलकर्णी मधुसूदन (८२.५९)%)तृतीय., द्वितीय वर्ष स्वयंचलित अभियांत्रिकी वर्गातून वेदपाठक पार्थ (८०.६३%)प्रथम, जाधव रोहन (७८.७५%) द्वितीय, सरवदे साक्षी(६९.५%) तृतीय,तृतीय वर्ष स्वयंचलित अभियांत्रिकी वर्गातून परमेश्वर दळवे (९२.३२%) प्रथम, बिराजदार अभिषेक (९१.६८%) द्वितीय, शेटे ऋतुराज (८६.६३%) तृतीय क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.
चि.जोशी वेदांत, कु. होळकर स्वाती, कु. घोरपडे तेजस्वी, कु. माळी अदिती कु. स्वामी शिवांजली यांनी गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून महाराष्ट्रात सर्वप्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. तसेच कु. वाकडकर शुभांगी व चि. बडे सौदागर यांनी गणित विषयात १०० पैकी ९९ गुण प्राप्त केले आहेत. या विद्यार्थ्यांना गणित विषयासाठी प्रा.नारायण सिरसाट
विभागप्रमुख प्रा.रोहित कदम, प्रा.नारायण सिरसाट, प्रा.अतुल फड, प्रा.श्याम गडदे प्रा. बप्पासाहेब सोनवणे व सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर, उपाध्यक्ष गणपत व्यास, का.उपाध्यक्ष ऍड.जगदीश चौसाळकर,सचिव कमलाकर चौसाळकर, कोषाध्यक्ष डॉ.शैलेश वैद्य,सहसचिव प्रा. भीमाशंकर शेटे,संचालक प्रताप पवार कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निकचे प्राचार्य रमण देशपांडे यांनी अभिनंदन केले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने तंत्रशिक्षीत होऊन योगेश्वरी शिक्षण संस्थेचे नाव महाराष्ट्रात उज्वल करत असून, मी सर्व संचालक मंडळाच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थी तंत्रनिकेतनच्या शिक्षक,कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो.
चंद्रशेखर बर्दापूरकर.
अध्यक्ष, यो.शि.संस्था अंबाजोगाई