अंबाजोगाईत निघाली कॅन्सर जनजागृती रॅली कॅन्सरचा वाढलेला विळखा चिंताजनक – डॉ.प्रियंका राठोड
अंबाजोगाई-:
अंबाजोगाई शहरात जागतिक कॅन्सर डे च्या निमित्ताने भारतीय जैन संघटना व आयएमए अंबाजोगाई, रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी ,अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य अशी जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीद्वारे सामाजिक संदेश देण्यात आला व विविध घोषणांनी अंबाजोगाई शहर दणाणून गेले.
राष्ट्रीय कॅन्सर डे च्या निमित्ताने सामाजिक संवेदना जिवंत ठेवत आणि भारतात वाढत असलेले कॅन्सरचे प्रस्थ हे चिंताजनक असून याला प्रतिबंध घालता यावा. यासाठी शहरातील
भारतीय जैन संघटना, आयएमए संघटना, रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी आणि, कै बाबुराव घुले नर्सिंग कॉलेज, कै प्रमोद जी महाजन नर्सिंग कॉलेज, शासकीय नर्सिंग कॉलेज, लोखंडी, वेंकटेश नर्सिंग कॉलेज, आशा वर्कर्स, अस्तित्व महिला संघटन, अंबाजोगाई इ च्या पुढाकाराने जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा व लातूर येथील प्रसिद्ध कॅन्सररोग तज्ञ डॉ. प्रियंका राठोड मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी आयएमएचे अध्यक्ष डॉ.नवनाथ घुगे, आयएमएचे सचिव डॉ.सचिन पोतदार ,रोटरीचे जिल्हा सचिव सतीश लोणीकर, रोटरी अंबाजोगाई चे अध्यक्ष रो कल्याण काळे, सचिव धनराज सोळंकी,तसेच भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष साहिल मुथा,सचिव आदेश कर्नावट यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.पांढऱ्या रंगाची फीत कापून या कॅन्सर डे जनजागृती रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले कॅन्सर जनजागृतीचे फलक घेतले हाती घेतलेले होते. विविध घोषणा या ठिकाणी दिल्या जात होत्या. तर एलईडी व्हन द्वारे चौकाचौकात व अबाजोगाईतील शाळेत जावुन व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती केली जात होती. ही रॅली अंबाजोगाई शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सुरू झाली त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, सायगाव नाका, जुना पेट्रोल पंप, छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर चौक ते संत मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह या ठिकाणी या रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी लातूर येथील कॅन्सर रोग तज्ञ डॉ. प्रियंका राठोड यांनी उपस्थितांना महत्त्वपूर्ण सूचना करून प्रत्येकाने आता कॅन्सरची काळजी घेतली पाहिजे असे सांगितले. आयएमएचे अध्यक्ष डॉ. नवनाथ घुगे यांनी मार्गदर्शन केले.
या रॅलीत आयएमएचे अध्यक्ष डॉ. नवनाथ घुगे, सचिव डॉ. सचिन पोतदार डॉ. सुधीर धर्मपात्रे, रोटरीचे ओमकेश दहिफळे, डॉ. अनिल केंद्रे, स्वप्नील परदेशी, भीमाशंकर शिंदे, अंगदराव कराड,डॉ.निशिकांत पाचेगावकर, राजेंद्र घोडके, जगदीश जाजू, गणेश राऊत,डॉ. सुरेश आरसुडे ,स्वरूपा कुलकर्णी, बालाजी घाडगे ,संतोष मोहीते ,अजित देशमुख, तसेच भारतीय जैन संघटनेचे प्रवीण सोळंकी, निलेश मुथा ,संतोष डागा,जवाहर मर्लेचा ,विजय बडेरा, मयूर बडेरा, पियुष मुथा, उदय रूपडा, मीना डागा, सुनीता कात्रेला तसेच शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र असेल उपकेंद्र असेल व रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,स्टाफ नर्स, आरोग्य सेविका सेवक शिवाय विविध नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी व त्यांचे प्राचार्य आणि कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते. या जनजागृती रॅलीचा समारोप संत मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह या ठिकाणी पार पडला या ठिकाणी सुद्धा आयएमएचे अध्यक्ष डॉ. नवनाथ घुगे यांनी मार्गदर्शन केले. धनराज सोलंकी यांनी आभार मानले.