उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव जी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दिर्घायुष्य मिळावे यासाठी विविध उपक्रम
अंबाजोगाई(प्रतिनिधी )
शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव जी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दिर्घायुष्य मिळावे यासाठी श्रीयोगेश्वरी मातेची महाआरती व चनई येथील किरमाणी बाबाच्या दर्गा येथे चादर चढवून प्रार्थना करण्यात आली राज्याचे ऊप मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब खा.श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना सचिव संजय मोरे,मराठवाडा संपर्क नेते आ. अर्जुन खोतकर,संपर्क प्रमुख विजय पाटील,युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई शिवसेनेच्या वतीने येथील ग्रामदैवत योगेश्वरी देवी मंदिरात महाआरती करण्यात आली असून त्यानंतर किरमाणी दर्गा येथे चादर चढवण्यात आली या वेळी ऋषिकेश लोमटे ,गजानन मुडेगावकर,दादासाहेब देशमुख,दत्ता बोडके,रमेश टेकाळे,विजय जाधव,दत्ता नाना देवकर,विजय पवार,प्रमोद दाभाडे,अवधुत कदम,समाधान पिसाळ,नागेश सावंत,खंडु पालकर,राम भोसले,रत्नेश्वर वाघमारे,ईस्तीयाक शेख,अशोक साळुंखे,इस्माईल शेख,अक्षय भगत,सौरभ आडे,गणेश उदार,सागर बनसोडे,तुषार चव्हाण यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते