अंबाजोगाई(प्रतिनिधी)
येथील आकांक्षा अंगदराव कऱ्हाड यांची महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागात जलसंधारण अधिकारी ( गट -ब) म्हणून निवड झाली आहे. आकांक्षा ही अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेचे संचालक अंगदराव कऱ्हाड यांची कन्या असून तिने आपले शालेय शिक्षण श्रीमती गोदावरीबाई कुंकुलोळ योगेश्वरी कन्या शाळा व महाविद्यालयीन शिक्षण योगेश्वरी महाविद्यालय,अंबाजोगाई येथे पूर्ण केले. तसेच तिने MBES कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अंबाजोगाई येथून बी.ई (सिव्हिल) तर Geotechnical Engineering BKIT भालकी येथून M.Tech. पूर्ण केले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने 2023 साली आयोजित करण्यात आलेल्या एकत्रित स्पर्धा परीक्षेच्या निकालावर आधारित जलसंधारण अधिकारी म्हणून त्यांना महाराष्ट्र शासनाने नियुक्ती पत्र दिले आहे.
तिने मिळवलेल्या या यशाबद्दल योगेश्वरी शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक डॉ.सुरेश खुरसाले, संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर बर्दापूरकर, सचिव कमलाकरराव चौसाळकर, कोषाध्यक्ष डॉ.शैलेश वैद्य तसेच संचालक मंडळातील सर्व सदस्य व इतर प्रतिष्ठित मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले आहे.