*चार वर्षापुर्वीच्या मर्डर मधील दोन तर 19 मोटार सायकल चोरीमधील एक आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने मोठया शिताफीने पकडले*
अंबाजोगाई प्रतिनिधी:-
बीड जिल्हयामध्ये गुन्हेगारी याचा आढावा घेतला असता बऱ्याच गुन्हयामधील आरोपी हे गुन्हा केल्यानंतर पळुन जातात व मिळुन येत नाहीत त्यामुळे बीड जिल्हयामधील पोलीस अभिलेखावरील पाहीजे व फरारी आरोपीस पकडुन संबधीत पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्या बाबत वरीष्ठांनी आदेश दिल्याने चार वर्षापुवीच्या खुनामधील दोन आरोपी व 19 मोटार सायकली मधील एक असे तीन आरोपींना पकडण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे या बाबत सवीस्तर वृत्त असे की दिनांक 31.08.2021 रोजी यातील फिर्यादी नामे दिलीप अभिमान धोत्रे रा.अंबाजोगाई यांनी पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर येथे तक्रार दिली होती की, डुक्कर का मारले या कारणावरुन अंबाजोगाई येथील आरोपींनी फिर्यादीच्या भाऊ रवी अभिमान धोत्रे यास खंजीर व चाकुने भोसकुन एकुण 11 आरोपींनी त्याचा खुन केला होता यातील आरोपी हे गुन्हा केल्यापासुन फरार झाले होते. पोलीसांनी वेळोवेळी शोध घेवुन देखील मिळुन येत नव्हते. या गुन्हयातील आरोपी हे परळी येथील उड्डाणपुलाखाली दिसल्याचे गोपनिय बातमीदारामार्फत माहीती स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास मिळाल्याने सदरील पथकाने तात्काळ परळी येथे जावुन सापळा रचुन मोठया शिताफीने खुनामधील दोन आरोपी 1.तेजसिंग उर्फ तेजेश शेरसिंग गोके, वय 35 वर्ष, 2.पुनमसिंग तारासिंग टाक, वय 40 वर्ष, दोन्ही रा शासकीय बांधकाम विभागाचे पाठीमागे असणाऱ्या झोपडपट्टी अंबाजोगाई याचा शोध घेवुन सकाळी ताब्यात घेतले आहे. तसेच त्याचे सोबतच अंबाजोगाई,बीड व लातुर जिल्हामधील एकुण 19 मोटार सायकल चोरीच्या गुन्हयामध्ये फरार असलेला आरोपी नामे रोशनसिंग यशपालसिंग उर्फ रिशपालसिंग टाक, वय 20 वर्ष, रा.अंबाजोगाई हा देखील आरोपी मिळुन आला आहे.सदरील तीन ही आरोपी हे पुढील कारवाई कामी पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरील कारवाई हि श्री नवनीत काँवत, पोलीस अधीक्षक,बीड, श्री चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई, श्री उस्मान शेख, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांत, पोलीस हवालदार मारोती कांबळे, विकास राठोड, बाळकृष्ण जायभाये, विष्णु सानप, राजु पठाण, मनोज जोगदंड, पोलीस अंमलदार बप्पासाहेब घोडके, चालक नितीन वडमारे व गणेश मराडे यांनी केली आहे.