*काँग्रेस शहराध्यक्ष असेफोद्दीन (बाबा) खातीब यांच्या रोजा इफ्तार चा कार्यक्रमास हजारो हिंदू मुस्लिम बांधवाची उपस्थिती*
अंबाजोगाई प्रतिनिधी:-
रमजान ईद व त्यानिमित्त राजकीय भाईचारा जपण्यासाठी वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते नेते यांच्याकडून रोजा एकतारीचा कार्यक्रम घेण्यास सुरुवात करण्याअगोदर अंबाजोगाई काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष असलेले सर्वांच्या परिचयाचे असेफोद्दिन (बाबा) खतीब यांच्याकडून सर्वात अगोदर अंबाजोगाईत रोजा इफ्तारचे आयोजन करण्यात आले
दर वर्षी प्रमाणे या वर्षी ही अखंडित पणे अन्नदान,सामाजिक उपक्रम कुठले ही कारन असो की नसो लोकांसाठी आंनदाने अन्नदान करत आसतात हे करण्यात कधी ही मागे न रहाता आज संपूर्ण अंबाजोगाई तील मुस्लिम बांधवान किरमानी दर्गा प्रांगणामध्ये असेफोद्दिन(बाबा )यांनी रोजा इफ्तारीचा मोठा कार्यक्रम घेण्यात आला या लहान मोठे हिंदू , मुस्लिम बांधव उपस्थित होते सर्वांना एकत्रित बसून फळ आहार सरबत त्यांच्यासमोर ठेवून सुरुवातीला दुवाच पठण करण्यात आले व् रोजा इफ्तारी नंतर मुस्लिम बांधवानी नमाज अदा केली
रमजान चा पवित्र महिन्या मध्ये उपवास करणाऱ्या लोकांना जर उपवास सोडण्यात आपण काही मदत केली तर आल्ला आपणास उदंड आयुष्य देतो आयुष्यात कुठलीही अडचण आल्ला येऊ देत नाही ही जी शिकवन जमलेल्या बांधवाना देण्यात आली गोर गरिबांना सढलं हाताने मदत करणारे व समाजिक राजकीय क्षेत्रात सदैव अग्रेसर असलेले तडफदार काँग्रेस चे शहरअध्यक्ष असेफोद्दिन (बाबा) खतीब आवर्जून पुढाकार घेतात.
रोजा इफ्तारी कार्यक्रमासाठी राजूभाई,समियोद्दीनभाई कलनदरभाई ,रफिक भाई अफजलभाई,अहमदभाई,फेरोजभाई, आरेफभाई ,एजाजभाई यांनी मेहनत घेतली