*संगीत साधना मंचची संगीत सभा उत्साहात*
अंबाजोगाई प्रतिनिधी: –
संगीत साधना मंचच्या वतीने
मराठवाड्यातील गायिका सध्या पुणे स्थित स्वरेशा पोरे (कुलकर्णी) यांची गायन सभा रविवारी उत्साहात संपन्न झाली.
दुसऱ्या प्रहरात संपन्न झालेल्या समय चक्रा नुसार राग ऐकण्याची या सभेत सुरुवातीला स्वरेशा पोरे यांनी सकाळच्या दुसऱ्या प्रहरातील राग नटभैरव विलंबित एकतालातील, समझत नही या बंदिशीने आपल्या गायनाची सुरुवात केली
यानंतर नाचत नटराज या द्रुत तीन तालातील बंदीशीने रसिकांची मने वेधून घेतली .
यानंतर स्वरेशा पोरे यांनी पंडित सी. आर.व्यास रचित राग बिलासखानी तोडी मधील “त्यज रे अभिमान,जान गुनियन सो ‘ ही सर्व परिचय बंदिश सादर केली. यानंतर दृत एकतलातील “जागत तोरे कारण बलमा अनोखी बंदी सादर केली या बंदीची वैशिष्ट्य म्हणजे, अस्थाई एक तालाच्या वजनाने जात होती आणि अंतरा मात्र तिनतालाच्या वजनाने जाऊन परत एकदा एक तालाच्या वजनाला भिडत होता., ही तालाची समज, रसिकांना सौ.स्वरेशा पोरे यांनी समजावून सांगितली आणि लिलाया करूनही दाखवली.
यानंतर प्राणेश पोरे रचित “गिनत हारे ‘ या अर्थपूर्ण आणि अप्रतिम बंदिशीने, समस्त रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.यानंतर समर्थ रामदास रचित “तानी स्वर रंगवावा ‘या अभंगाने संगीत सभेची सांगता झाली.
संवादिनीवर विश्वजीत धाट तर तबल्यावर रत्नदीप शिगे यांनी साथसंगत केली.
सभेच्या रंजकतेचा चढता आलेख उपस्थित रसिकांनी अनुभवला.