*कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्सचा सृजन २०२५ महोत्सव उत्साहात संपन्न*
*मराठवाड्यातील विविध जिल्ह्यासह २०० हून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*
अंबाजोगाई (प्रतिनिधी):- श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या , बी सी ए वतीने “सृजन २०२५” हा माहिती-तंत्रज्ञान आधारित उपक्रम २० मार्च २०२५ गुरुवार रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. सीमा व्ही येरगिरी विभाग प्रमुख, इंजिनिअरिंग कॉलेज, अंबाजोगाई यांच्या हस्ते झाले, तर टेक्नोसॉफ्ट कंपनी कलबुर्गीचे संचालक विवेक होंगुंटीकर, मॅनेजिंग डायरेक्टर संकेत मोदी आणि सौ. डिंपल मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. तर कार्यक्रमात बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक राजकिशोर मोदी, प्राचार्य डॉ. बी.आय.खडकभावी, प्रा. व्ही. बी. चव्हाण,प्रा डी. एच. थोरात,प्रा राघवेंद्र राजमान्य, डॉ. व्ही. एस. हमदे , प्राचार्य डॉ. तपस्या गुप्ता तसेच सर्व युनिट प्रमुख उपस्थित होते.
या कार्यक्रमात श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी संचालक संकेत मोदी यांनी सृजन २०२५ ही संकल्पना राबविण्यामागची कारण मीमांसा विशद केली. विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान विषयांतील माहिती केवळ आपल्या महाविद्यालयापुरतीच अवगत न होता अन्य जिल्ह्यातील महाविद्यालये तसेच तेथील प्राध्यापक वृन्दाकडून देखील अवगत केल्या जाऊन आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी त्या त्या विषयात निपुन व्हावा ही यामागची कल्पना असल्याचे संकेत मोदी यांनी नमूद केले. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला चालना देणारा ठरला असून, भविष्यातही असे उपक्रम आयोजित करण्याचा महाविद्यालयाचा मानस असल्याचे संकेत मोदी यांनी याप्रसंगी व्यक्त केला. याप्रसंगी अनेक सहभागी विद्यार्थ्यांनी
पेपर प्रेझेंटेशन अँड प्रोगामींग कॉन्टेस्ट, कोड क्राफ्टर या विषयावरील स्पर्धेत सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमाच्या उद्घाटिका इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या विभाग प्रमुख प्रा डॉ सीमा येरगिरी यांनी उपस्थित तथा सहभागी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. आजचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे युग आहे. यामध्ये दररोज नवनवीन प्रयोग केले जात आहेत व ते यशस्वी करण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. चंद्राला गवसणी घालून मानव अंतराळात विसावत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यां हे सदैव प्रयत्नशील , प्रयोगशील असला पाहिजे असा मौलिक सल्ला डॉ सीमा येरगिरी यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात कोणत्याही एका ठराविक प्रयत्नांवर समाधानी न राहता अजून त्यात काही नाविन्य करता येईल का यासाठी अभ्यास केला पाहिजे असेही सृजन २०२५ या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ येरगिरी म्हणाल्या. या महाविद्यालयाचे संस्थापक राजकिशोर मोदी तसेच संचालक संकेत मोदी हे आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी हा सदैव परिपूर्ण झाला पाहिजे या भावनेतून काम करत असल्याबद्दल त्यांचे देखील अभिनंदन केले. त्यानंतर उपस्थित अन्य मान्यवरांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून या उपक्रमांचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सृजन २०२५ या माहिती व तंत्रज्ञान विषयी स्पर्धेतील विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.विजेत्या स्पर्धकांना पंचवीस हजारांची बक्षीस देण्यात आली. सर्व प्रमुख पाहुण्यांनी सर्व विजेत्या स्पर्धकांचे कौतुक केले. श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले होते. या उपक्रमाला लातूर, बीड, धाराशिव आणि परभणी यासह विविध जिल्ह्यातील नामांकित महाविद्यालये तसेच विद्यार्थ्यांनी यात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन हा उपक्रम यशस्वी केला .