अंबाजोगाईत युवकावर तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला; युवक गंभीर जखमी
अंबाजोगाई प्रतिनीधी :
अंबाजोगाई शहरातील गवळी पुरा भागातील राजकुमार करडे या युवकावर तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला झाला असून जखमी झाल्या युवकस स्वा रा ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यात दिवसागणिक गंभीर गुन्ह्यांच्या घटनांत वाढ होत आहे. अशातच अंबाजोगाईतून आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील पोखरी रोडवर एका तरुणावर दोन तरुणांनी कोयतासदृष्य धारदार शस्त्रांनी सपासप वार करून त्यास गंभीर जखमी केले. जखमी तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. राजकुमार साहेबराव करडे (वय ३०, रा. गवळीपुरा, अंबाजोगाई) असे हल्ल्यात जखमी तरुणाचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार ही घटना सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. राजकुमार याच्यावर पोखरी रोडवरील सारडा नगरी जवळ दोन तरुणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्याच्या गळ्यावर, डोक्यात, पाठीवर सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात राजकुमार गंभीर जखमी झाला. त्याच्यावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, हा हल्ला जुन्या वादा मधून झाल्याचे समजते.