महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार उद्या अंबाजोगाईत ? ‘स्वाराती’ रुग्णालयाला ‘सरप्राईज व्हिजीट’ ?
अंबाजोगाई प्रतिनिधी:–
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे उद्या दिनांक 2 एप्रिल बुधवार रोजी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून अंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रुग्णालयाला ते ‘सरप्राईज व्हिजीट’ देणार असल्याची खात्रीलायक माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे. त्या दृष्टीने ‘स्वाराती’ रुग्णालय प्रशासन तयारीला लागले आहे. स्वाराती’ रुग्णालय सध्या विविध समस्यांनी ग्रासले आहे.
रुग्णालयात मनुष्यबळाची कमतरता, निधीअभावी इमारतींची अर्धवट बांधकामे, वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे असंख्य प्रश्न यामुळे सध्या ‘स्वाराती’ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय चर्चेचा विषय बनले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीड जिल्ह्यात येणार असून ‘स्वाराती’ रुग्णालयाला ते ‘सरप्राईज व्हिजीट’ देणार आहेत. या व्हिजीटमध्ये ‘स्वाराती’ च्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होईल, अशी अपेक्षा करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या दौऱ्याकडे संबंध अंबाजोगाईकरांचे लक्ष लागले आहे.